Posts

Showing posts from 2015

swikar aahe

स्विकार आहे आज मजला ,जे हवे मागुन घे. बाहुत घे या वादळा ,आकाशही मोजुन घे. ललकार माझी गर्जते ,झटकुन ऐसी बंधने.   झोकुन दे या सागरा ,लाटांसवे उसळूण घे. आहेच मी वाऱ्यापरी ,कोठेच ना थांबायचा. आता असा मी थांबलो,माझ्यासवे वाहुन घे. मी जानतो आता सखे ,आहे मनी लपवु नको. डोळ्यात मी ते पाहिले , तु लाखसे झाकुन घे. जातोय हा मी चाललो ,आता तरी बोलुन घे. जेजे हवे ते माग राणी ,जिवही जिंकुन घे.                                     — अजय निंबाळकर

भेट

मज सांगायाचे होते दडलेले बरेच काही.. राहीले अंतरी सारे बोलणे जाहले नाही.. तव भेट तरीही घडली नेहमीच्या झाडामागे. ती लाख लाजली तरीही तो लाजुन चांदने पाही.. शहारुन निघाला वारा मंतरुन गेल्या राती निरंतर तेवत होत्या दोघ्यांच्या लज्जीत वाती.. थोडासा जवळी जाता रातीने गंध पसरला.. केसात गुतला तारा तो चांद देखिला नाही मौनाची सुटली गाठ बोलणे जाहले अवघे. स्पर्शाच्या जादुसाठी व्याकुळ तरीही दोघे. ते तेज पाहुनी आता झोपही पळाली सारी.. पाहीले सखीला आणी मी वेळ दवडली नाही. प्रणायाणे गंधित झाले दोघेही स्वर्गी भिनले. आयुष्य तया दोघांचे अंशात गुंतूनी गेले. ईश्वरी प्रेम लेवोनी बंधील्या रेशमी गाठी.. मग सरणावरही निजले जोडुन आपल्या पाठी.. —अजय निंबाळकर.

जमतात म्हणून लिहतो अस नाही काही

Image
जमतात म्हणून लिहतो अस नाही काही। एक एक शब्द हल्ली तिची वाट पाही .…।