Posts

Showing posts from April, 2017

एका वडाची परवड ....

Image
एका वडाची परवड ....             कधी कधी मातीची खूप आठवण येऊ लागलीना कि मग मी भारताचा नकाशा desktop ला लावतो आणि मनभरून google earth वरती झूम करत करत माझ्या आईच दर्शन घेतो.अगदी काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेला माझा  विशाल भारत डोळ्यात बसवताना त्याच्या महानतेची प्रचीती येते.केवढा आपला देश आपण किती नशीबवान आहोत कारण आपण इथ आहोत.बघा न जगातली सारी वातावारणे एका नकाशात पाहायला मिळतात.वाळवंटही आहे हिमशिखरे देखील  आहेत, खेडी आहेत शहरे हि आहेत,नद्य,तलाव जंगले अरण्ये...अन कित्ती काय.भारताची आठवण आली म्हणून काही हे बोलतोय अस नाही ना दिखाऊ देशभक्तीचे झंझावाती वारेही माझ्या डोक्यात शिरले आहे असेही नाही जे कि घोषणा देऊन व एखाद्याला धमकावून माझ मन अभिमानाने भरून येयील असं देखील अजिबात नाही.हल्ली बातम्यांमध्ये पाहून काळतच आहे भारत महान आहे तितकाच इथल्या काही लोकांचा मेंदू लहान आहे जे काही संकुचित विचारांना मोठ करून संपूर्ण भारतीयत्वाचे झेंडे मिरवताना दिसतात.जाऊदे मला त्या विषयात नाही पडायचं हा तर संपूर्ण भारतीयत्व म्हणजे काय ओ ?घ...