नमस्कार करते हं...!
नमस्कार करते हं...! १ जानेवारी १८४८ साधारणपणे १७० वर्ष झाली असतील फुल्यांनी स्त्रीशिक्षण आणि समतेची कवाडे खुली केली आणि संस्कृतीच्या नावाखाली जखडलेल्या साखळ्या सैल करत माझी आई ,आजी ,बहिण...लिहिती बोलती झाली.आजवर भारतातल्या प्रत्येक उच्च पदावर विराजमान होऊन तीनही तीच सामर्थ्य सिद्ध केलय.संसदेत भल्या भल्यांची पुंगी थंड करणाऱ्या इंदिरा गांधी , सुषमा स्वराज असोत कि अंतराळात सर्वाधिक स्पेस वॉक करणारी सुनिताव कल्पना चावला असो सावित्रीच्या लेकी आज कुठेच मागे नाहीत.जगभरात तर आहेच पण भारतात आज कोणत्याही परीक्षेत मुलींचं उत्तीर्ण होण्याच प्रमाण जास्त आहे पण मी हे अचानक का बोलतोय! परवाच माझ्या एका मैत्रिणीचा फोन झाला तीच MBA finance झालय,चांगल्या खाजगी कंपनीमध्ये नोकरी करत आहे हाताखाली २-३ ट्रेनी पण आहेत.वय लग्नाच झालय म्हणून मीच गंमत करत तिला म्हणायला गेलो “काय काय,कांदेपोहे झाले कि नाही?” वाक्य संपल न संपल तोच एक मोठा पॉस घेतला तिने अन माझ्याही ...