श्वास
श्वास मागतात लोक जिथं तो खास बैठकीत व्यस्त आहे बुलेट ट्रेन , हजारो कोटींची विमानं , भले मोठे, पुतळे मंदिरे , पक्ष कार्यालये , आलिशान संसद ज्याची स्वप्ने आज तिथेच गरीबांची मौत स्वस्त आहे तो म्हणाला दौरे करु, आम्ही मान हालवली लाखोंची गर्दी त्याच्यामागुन चालवली त्याला चिंता सत्तेची, पिपासु नितीमत्तेची कुंभ झाले निवडणूका झाल्या तरी या सुंभास तमा नाही घर जळताना जपतोस पाहुणचार प्रतिमेचा हावरा किती रे तू दुर्दैव, आमची तुझ्यावरच भिस्त आहे!! बोट दाखवायची वेळ नाही तरी पिलांना खिजवतोस सोबत घेवुन चालायच्या वेळीच नेमका फसवतोस किती तोतया तुझे अश्रु हाहाकारातही फिरतोस तू जिंक बाबा सगळी राज्ये तसेही काय करतोस तू!! डॉक्टर थकलेत, पोलिसही थकलेत तुला रे कसले कष्ट आहे! लोक तरी कुठे जागे होतात ! त्यांची दुनिया ३ जिबी डाटा मधेच रमली आहे तुझ्यावर टीका करावं तर लगेच तुझी भडवी फौज जमली आहे पण आता संयमाचा बांध पुरता तुटतो आहे ज्याचा जिवलग जातो त्याचा तुझ्यावर आशुळ उठतो आहे कितीरे पचवशील गरिबांचे शाप! राजकारणाच्या उकिरड्यांवर तुझी ...