Posts

Showing posts from February, 2017

देशभक्ती..एक नाटुकल

देश भ क्ती ... एक नाटुकल पक्या : देशभक्त ज्ञानी मन्या : कुतूहलीत देशभक्त पक्या : मन्या लेका कायतर केल पाहिजे लका,(मावा खून थुंकत ) आपल्या देशाची किंमत नाय हेनला ! मन्या : म्हणजे ओ दादा ! (सिगारेट पेटवत ) पक्या : अरे मंदाट्या,ह्या चड्ड्या घालून फिरणाऱ्या पोरी ! (गोगल वर सरकवत पार मुलगी दिसेना होते तोवर बघत ) मन्या : लय भारी दिसत्यात नाय दादा (लाजत) पक्या : अरे काळ्या ते न्हायी रे ..या पोरींनी देशाची पार अब्रू घालवली हाय बघ.कश्या वागत्यात काय फिरत्यात ! मन्या :भाऊ खरय बघा .. पक्या : लेका तिथ सैनिक जीव देतायत आणि या सेल्फी घेतात ! देशभक्ती च काय हाय का नाय ! मन्या : होय दादा,यांना सगळ्यांनी मिळून शिकवायलाच पाहिजे,मारू काय किक ? मन्या : पण तेनला सांगायचं काय ? पक्या : सांगायचं ! दोन द्यायच्या ठेऊन ...साधा चुडीदार घालून टिकली लाऊन आलीस तर ठीक (ढुंगणावर घसरलेली गुध्यावर फाडलेली  जीन्स  वर घेत) मन्या : मग तर आपल्या दादा गैंग च्या कोण वाऱ्याला पण याच नाय पक्या : येत्या १५ ऑगस्ट ला गैंग ची पोर घेऊन बायिक राली काढू तिरंगा घेऊन,या सगळ्या स्कुटी व...

एक झाड करपून गेल

Image
एक झाड करपून गेल एक झाड करपून गेल आजही नळाला पाणी आल न कोण रडल ना सुतक आल योजनेमध्ये लावल होत याच होत ना त्याच होत पाऊस औंदा झाला चांगला तवाच शेवटच न्हान झाल जनावर पण चाखत नव्हत वाडास कोणी देखत नव्हत सिझन गेला फोटोचा अन ऊन पानास जाळून गेल कुणी मुतल म्हणाव तरी सावली एवढ झाल नव्हत मालक वासा डोळ्यात राखाय सरकारी जागेत रंगून मेल   दिवाळी झाली शिमगा झाला वाळल्या काडीचा हुरडा केला बघता बघता मोसम गेला वैशाख वणव्यात पुन्हा एकदा वृक्षारोपणाची जागा झालं एक झाड करपून गेल आजही नळाला पाणी आल ......                            -अजय निंबाळकर