Posts

Showing posts from June, 2016

पाणी सोडा

"पाणी सोडा" खुप दिवस पाऊस पडत नाही म्हणुण बामनाने यज्ञ केला चंदन बेल तुळस लिंब बाभुळ मुळासहीत स्वाहा केला तोवर निळ्या आकाशात एक पांढराशुभ्रढग आला सगळा धुर छातीत भरुण जगासाठी काळा झाला बामन म्हणाला बघ मुर्खा इंद्रदेव प्रसन्न झाला जुन गेला जुलै झाला श्रावण सोमवार देखील आला सुगीतला पायलीभर तांदुळ पुण्हा दिक्षा म्हणुण घेवुन गेला आता शेतकरी परत शेतात आला बेल चंदन लिंब तुळस सारं पुण्हा लावु लागला झर झर नारा घाम त्याचा नव रोपांचा खुराख झाला पालवी आली बघता बघता निसर्ग झाला हवेत गारवा नभात मारवा शुभ्र ढगात पाऊस झाला.. नद्या भरल्या ओढे हसले बेडुक चातक येथेछ भिझले तिन पानाचा बेल देता म्हणत मार्गशीष दारी आला आता बुद्धी गहाण नव्हती शेतकरी ही शहाणा झाला मातीत रोवलं बेलरोप ते घेवुण त्याच्या समोर आला म्हणाला महाराज "पाणी सोडा" अजय निंबाळकर 8698415760