Posts

Showing posts from September, 2018

अदृश्य

Image
अदृश्य जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला मनासारखं आकाश भेटतं , वारा भेटतो , पाणी भेटतं , आजूबाजूला झाडे भेटतात , प्राणी भेटतात , रस्ते भेटतात , इमारती , घरे , छपरे , देव , देवळे , मशिदी , चर्च , गावे , शहरे आणि त्यातल्या भरमसाठ गर्दी देखील भेटतात ..फक्त माणसे मात्र मनासारखी भेटतीलच असा मात्र नेम नाही. वर समजा भेटलाच एखादा किंवा एखादी तर याच भेटल्या वाटा त्यावरची घरे , देवळे , मशिदी , चर्च , शहरे , त्यांच्या गर्द्या अचानक जाग्या होतात आणि कालवर दुर्लक्षित केल्या त्याच माणसाला आपल अस्तित्व दाखवून ना ना   प्रकारच्या साखळ दंडात पुरते लपेटून टाकतात. यात मग काही साखळ्या देवळांच्या , मशिदींच्या , चर्च , गुरुद्वारे आदींच्या ,, काही जातीच्या , काही जमातींच्या , काही फक्त भिंतींच्या , गर्वाच्या , काही पैश्याच्या तर काही फक्त आरश्याच्या माणसाला परत त्या निर्जीव गर्दीचा एक घटक बनवून सोडतात. वर समजा तुम्ही यांचा बिमोड करू पाहिलात तर तुमचे भावनिक बाण तयारच असतात आई , बाप , भाऊ काका , मामा अशी असंख्य टोके नेम धरून तयारच असतात तुमचे हेतू उद्वस्त करून तुम्हाला आरश्यात बंदिस्त करण्यासाठी. यात...
                              बेवा कल देखा किसिके बाप ने बना दिया बेवा अपनी हि लड़की को   तेलंगाना में क़सूर था बस इतना जो उसने प्यार किया अपनी जाती को लाँघ कर बस किसी इंसान से ब्याह किया ना करती तो शायद वो आज ज़िंदा होता वो किसी और लड़की से बिना प्यार शादी करता ये भी किसी लड़के संग ब्याह रचाए बस वैश्याकी नींद में ज़िंदा होती ना निंदा होती ना ख़ून बहता पर ज़िंदा कौन रहता मन से दोनों में ?? क्या ख़ूब गर्व होगा बाप को अपने ख़ून से लथपथ हाथों पर जाती वालों में फकर होगा ज़िक्र होगा इन मर्दानी बातों पर भाई बाप का गुणगान करेंगे खून साफ कर इंसाफ करेंगे जाती के लिए जान न्योछावर ..सबक रहेगा कानों में लड़की बिधवा सुंदर यौवन अब औरो का रंजन चित्र बनेगी सांसो भरे इस शवको लेकर बस दिनमें अब रात भुनेगी कहा गया वो कृष्ण कहा वो राधा कौने धाम गयी गिनो सुनो रे मेरे भगवन यहाँ द्रोपदी हर शाम नयी कितनी मीरा कितनी राधा बेवा है रे जमानों में फिर दोषी कौन है ?? ...

"संप करायाचे संस्कार"

Image
" संप कारायाचे संस्कार" पुणे : इंधन दरवाढीविरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक , कुमठेवर रस्त्यावर पीएमपी बस फोडली. मला नेमकं कळतंच नाही कीभारतीय पक्षांना सार्वजनिक मालमत्ता उद्ध्वस्त झाल्याशिवाय संप यशस्वी झाल्यासारखंवाटतंच नाही. मग त्यात कॉंग्रेस  , भाजप , डावे ,  उजवे , करणी , मोर्चे सारेच आले. जगभराला अहिंसेचा संदेश देणारा आपला भारत आणी त्याच भारतात होणारी ही उघड उघड हिंसा , दोन्ही किती विसंगत आहे. वाईट या गोष्टीच वाटत राहते कि आम्ही आपल्याच देशाचं वाटोळ करून आपल्या मागण्या मान्य करून घेण्याची अपेक्षा करत असतो.मागण्या तरी काय असतात ? चित्रपट प्रदर्शित होवू नये , पेट्रोल दरवाढकमी व्हावी , अमुक जातीला आरक्षण मिळावे , तमुक वर्गाला संरक्षण भेटावं आणि नाना प्रकार. या सर्व मागण्या मागतो तरी कोण ज्याने हि सरकारे निवडून आणलेली असतात . ब रं मग सरकार तुम्ही निवडून आणता , कर तुम्ही भरता मग याच करातून झेलेल्या जानसुविधांची वाताहत करून नेमका कोणाचा व कसला फायदा होतो  ? बरे तुम्ही मतदानातून रोष व्यक्त करू शकता , असहकारातून व्यक्त करू शकता , उपोषणा...