Posts

Showing posts from August, 2018

आठवणी

कधी कधी अचानक येणाऱ्या तुझ्या आठवणी मनाचे चारही कोपरे शोधुन तुझा अंश अंश पुन्हा उजळुन नवा करुन जातात तुझी माझी पहीली भेट, मनास भिडलेली ती नजर थेटतुझे सलग ते १४ नकार माझे विनवणीचे नाना प्रकार तुला दिलेली पुस्तकं अन् माझ्या त्या कवितांच्या वह्यातु मागे गिरवलेल्या माझ्याच  आडनावाच्या त्या नव्या सह्या हे सारंच आठवत जात समोर नकळत उंभ राहतं मग अंधाराचे पडदे हटतात, जिवनपटाला मागे नेतात एक एक क्षण पुन्हा नव्याने दाखवत ...स्वप्नांचे असे चित्रपट होतात कधी  कधी अचानक येणाऱ्या तुझ्या आठवणी ... तुला आठवतात ती मोगऱ्याची फुलं ?? मी हाताने हेलकावलेली कानामधली झुलं?तासभर उभे राहुन , मला नव्हे तर जगास पाहुन काॅलेज मधे मारलेल्या त्या गप्पा तुला हासवत खुमारलेल्या माझ्या हजारो थापा सारंच दिसु लागलं की मन परत त्या एकामाग एक कविता वाचुन घेतं जिच्यावर फक्त तुझाच हक्क असतो..त्यांचा प्रत्येक शब्द शब्द मला नव्याने तुझं होवु देतात जगात स्वप्नंच ती काय जिथं माणसं सुखी होतात? कधी  कधी अचानक येणाऱ्या तुझ्या आठवणी ... मावळतीला झुकता झुकता त्यांच्...

पृथ्वीमोलाचा माणूस : प्रा. पी. एन. भोसले

Image
           “पृथ्वीमोलाचा माणूस : प्रा. पी. एन. भोसले” “काही माणसं जगात तुमच्यासाठी यशाचा अमृतकलश घेवुन येतात तुमचं काम इतकंच उरतं की तो कलश स्विकारुन अमृतप्राशन करत आयुष्य यशस्वी करायचं पण या अमृतकलशासाठी त्यांना मात्र मंथनाला सामोरं जावं लागतं हे न ते कधी सांगतात ना भासवतात फक्त मुक्तकरांनी देत राहतात”            आयुष्याची वाट अक्षरश: भरकटनार वाटत होतं मला , जेंव्हा मि बिएस्सी पास झालो होतो.कोण म्हणत होतं औषध विक्रेता हो कोण साखर कारखाना कामगार हो , वैतागलो होतो राव. एमएस्सीची लिस्ट मध्ये नाव तर अशा जागी जिथॅ बरोबर सगळे प्रवेश संपतात. ते पाहुन तर पुरता हताश होऊन गेले होतो. समोर फक्त अपमान आणि अंधकार दिसत होता. पुणे विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा न दिले करणे तिकडे प्रवेश होत देखील अशक्य होते. रोज सकाळी उठायचं बाबा कामावर जाताच कोल्हापूरला सुटायचं दिवस घालवत थेट झोपी जायच्या वेळी येऊन मन खाली घालून पडायचं असा लाजीरवाणा दिनक्रम चालू होता . दिवा विझनीला येत कसा तडफडतो ...

माझ्या स्वप्नांना आकाश दाखवणाऱ्या शिक्षिका

Image
   कडते ( शिरोळे ) मॅडम                  माझ्या स्वप्नांना आकाश दाखवणाऱ्या शिक्षिका ...              हल्ली फारसे लिहित नाही मी कामात व्यस्त आहे म्हणा वा लिहायचा कंटाळा. रोजच्या आयुष्यात इतका रमून गेलोय वा इतका अडकून गेलोय म्हणा की , विचारांचे लोंढे मेंदूतून हाताच्या कोपऱ्या पर्यंत “साहेब लिहा” असे संदेश पोहोचवणाऱ्या वाहिन्यांनादेखील सुस्ती आलीये बहुदा.पण आज मात्र सारे अडथळे बाजूला करत लिहता झालो कारण परवाच एका बालमित्राचा बऱ्याच दिवसातून आलेला फोन. नेहमीप्रमाणे फोनवर गावतल्या खडान्खडा माहितीची , कोण काय केलं , कोण कुठ गेल याची उजळणी  करत असताना मित्राने सांगितले अरे तुला कळल का रे.. आपल्या वर्गशिक्षिका कडते मॅडम निवृत्त झाल्या . फोन संपला दोन दिवस उलटले वाटलं होत त्यांना एक फोन करावा पण पुन्हा वरील कारणानेच तेही जमले नाही मग फेसबुक वरती त्यांच्या निवृत्ती समारंभाचे फोटो पाहताना मात्र मनात तळमळ दाटली आणि  मग मात्र ख...

शब्द

शब्द शब्द बोचरा बोचरा घाव जिव्हारी कठीण शब्द परतवे मुढ शब्द साठवी सज्जन शब्द उनाडसा वारा शब्द जागता पहारा शब्द साठवुन मनी शब्द बनतसे घण शब्द विषारी दुधारी शब्द थोरला बारका वेळ येता शब्द बने ज्ञानियांचे हो वचण शब्द मनमोकळासा शब्द बेरकी जनाचा किती प्रकार तयाचे शब्द एक कुंजवण शब्द शब्द हा जपावा ज्याचा त्याला परतावा शब्द आपला दिसत काळ देतो आठवून मीही घेतली शपथ आता ठेवेन हिशेब पुरे झाली बडबड आता झोडपेन मन शब्द थांबता स्थिरसा भेटे आभाळाचे बळ रोज फुकाचा बोभाटा नसे वाटत नवीन शब्द शब्द मी वाचेन शब्द शब्द मी वेचेन गेला पुरा पावसाळा याच जीभी साठवेन शब्द ओठात मनात साठवेन हो ज्ञानात ऐसा लिहेन साजिरा जग भूलेल गाण्यात शब्द पूजेन मी नित्य शब्द भजेनही नित्य आता बोलणेच नाही शब्द खरा ठरवेन                    ...