Transcript
18 नोव्हेंबर 1962 रोजी शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली. तळागाळातील, गोरगरीब विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाची गंगा प्रवाहित व्हावी हा शिवाजी विद्यापीठ स्थापन करणेच मूळ उद्देश होता आहे यापुढेही राहील. साहजिकच छत्रपतींच्या नावाने सुरु झालेल्या आपल्या विद्यापीठाची वाटचाल देखील उल्लेखनीय आणि अभिमान वाटावी अशीच आहे. नुकतेच ‘नॅक’ (बंगळूर) यांच्यातर्फे करण्यात आलेल्या तिसऱ्या पुनर्मूल्यांकनात शिवाजी विद्यापीठ 3.16 सीजीपीए गुणांकनासह महाराष्ट्रातील सर्वाधिक अग्रमानांकित विद्यापीठ ठरले आहे. कोल्हापूर ,सांगली, सातारा परिसरातील विद्यार्थ्यांच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीची विद्यापीठ प्रशासनाला सुरुवातीपासूनच जाणीव राहिली आहे, ती आजही कायम असावी . केवळ पैशाअभावी विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी नाकारली जाऊ नये म्हणून अतिशय अल्प अथवा माफक शुल्कामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयीसुविधा उपलब्ध करण्याकडे विद्यापीठाचा आजही कल आहे. मला या विद्यापीठातून माझी पदवी घेतल्याचा सार्थ अभिमान आहे आणि तो कोणाला नसेल, छत्रपतींच्या नावाचा उल्लेख असणारी पदवी जगात दुसरीकडे कोठेही प्राप्त ह...