Posts

Showing posts from October, 2016

एक मराठा लाख मराठा

एक मराठा लाख मराठा  एक मराठा लाख मराठा स्वातंत्र्याची साख मराठा बदलाची ती हाक मराठा बलिदानाची राख मराठा आई भवानी आन मराठा सैन्यादालाची शान मराठा गनिमाला आव्हान मराठा रणांगणी तुफान मराठा कर्तव्याची मेख मराठा प्रगतीचा आलेख मराठा समतेची  सुरवात मराठा प्रत्येकाची साथ मराठा शिवबांचा संस्कार मराठा शंभू चा संहार मराठा जीजामायीला दैव मानतो रानारानींचा तीर मराठा भविष्याची भ्रांत मराठा अशांत तरीही शांत मराठा पुन्हा मिळोनी लाखमताने मुकी साद देतोय मराठा कोल्हापूर मराठा मोर्चात मी माझ्या शब्दातून चालत राहीन अजय निंबाळकर १५/१०/२०१६
                  आदिलशाही गर्दीसुद्धा आता वारशाने जमु लागली हा ह्या तो त्या घराण्याचा म्हणुण यांची हवा घुमू लागली...! लोकशाहीच्या सत्तास्थानी गांधी,ठाकरे ,पवार,फडणवीस आणि बर्याच आडनावांची नांदी रूजु लागली ....! अध्यक्षांची खुर्ची ज्ञान क्षमता सोडुन फक्त क्षमताहीन पुतण्या,पुत्र आणि पुत्री भोवतीच फिरू लागली..! चले जाव ...या एका हाकेवर संपला इंग्रज..! तिच ही गर्दी तिच्याच आवाजाला मुकू लागली. कधिकाळी रस्त्यावर न्याय भांडुन उपोषणात मिळायचा गांधी आता त्यांच्याच आडनावाची entry हेलेकाॅप्टरातुन घडु लागली प्रामाणिक कष्ट गेले खड्ड्यात ...! नैतिकतेची वाट लावत पुरोगामी म्हणवनारेंचीपण आंडी इथंच शिजु लागली गल्ली दिल्ली चौक आणि शहरं घराणेशाही जिथं तिथं तग धरू लागली अरे उघडा डोळे लोकशाहीचा धरुन पदर आदिलशाही पुण्हा आपली पावलं पेरू लागली अजय निंबाळकर 

असहकार

महान असे विचार प्रवाहित करणारे ४० कोटी महान  भारतीय महान होण विसरलेत ...                      भारताच्या स्वातंत्र्य प्राप्ती पर्यंतच्या भारतात महात्मा गांधी होते,आधी लोकमान्य  टिळक होते,भगतसिंग ,चंद्रशेखर आझाद...असे बरेच महान नेते होते ,क्रांतिकारी होते म्हणून देश स्वतंत्र झाला हे जरी खर असला तरी माझ मत सांगू...                       महान विचार सांगणे सोप आहे पण एकमताने तो एक महान विचार प्रवाहित ठेवण महाकठीण.माझ्या मते १९०५ ते 19४७ काळातील प्रत्येक नागरिक देशासाठी महानच होता.१९२० ला एकटे बापू म्हणाले म्हणून ३३ कोटी लोक असहाकारावर उतरले विलायती मालावर असा काही बहिष्कार टाकला की इंग्रज सरकारला तोंड दाबून बुक्क्यांचा मार बसला...पण एक साधी गोष्ट ध्यानात घ्या की असहकार एका गांधी किंवा कॉंग्रेस ने केला असता तर! तर  ही चळवळ इतिहासाने सुद्धा वगळली असती.महान अश्या ३३ कोटी भारतीयांनी देशभावना व देशभक्ती दाखवत जगाला एक आदर्श घालून दिला. अगदी चलेजाव च्या वेळेस असो व...