swikar aahe
स्विकार आहे आज मजला ,जे हवे मागुन घे. बाहुत घे या वादळा ,आकाशही मोजुन घे. ललकार माझी गर्जते ,झटकुन ऐसी बंधने. झोकुन दे या सागरा ,लाटांसवे उसळूण घे. आहेच मी वाऱ्यापरी ,कोठेच ना थांबायचा. आता असा मी थांबलो,माझ्यासवे वाहुन घे. मी जानतो आता सखे ,आहे मनी लपवु नको. डोळ्यात मी ते पाहिले , तु लाखसे झाकुन घे. जातोय हा मी चाललो ,आता तरी बोलुन घे. जेजे हवे ते माग राणी ,जिवही जिंकुन घे. — अजय निंबाळकर