प्रेम..

क्षणांच्या मोजमापाच्या मध्ये मी शोधतो तुजला
असा प्रत्येक वेळेला तिथे मी भेटतो तुजला

कशी राखेल ही दुनिया मला गर्दित एकाकी
इथे प्रत्येक चेहऱ्याच्या मध्ये मी पाहतो तुझला

निघालो धीर घेवोनी सखे तो आजवर पुरला
जसा तुटला तुझा पारा इथे पाऊस कोसळला

नकाशा सागतो नेहमी असा हा दुर आलो मी
कळेणा हाय वेड्याला मनाने भेटतो तुजला!

न सांगावे न बोलावे कुणा अठवून हा झरला
किती रोखु स्व:ताला मी तुझा अश्रुच ओघळला

तरीही काय लपवु मी तुझी का याद मज येते?
इथे प्रत्येक शब्दाशी असा मी गोवतो तुजला

कविता सोबती होते तुझा तो स्पर्श अठवाया
कधी तु एकटी असता तुला जी भासते काया

कळावे काय रद्दीला असेही प्रेम करती जे
असा अठवुन गझलेशी उराशी बांधतो तुझला

जे अंतर देत असे उर्जा तयाला प्रेम म्हणतो मी
असा मी एकटा उरता तया एकांत म्हणतो मी

नभाशी चादंणे असता कसा तुझ दुर समजु मी
असे तु सांग जगताला नभाशी पाहते मजला


अजय निंबाळकर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

"संप करायाचे संस्कार"

आम्ही कशाला!!!

Shabd saath