देशभक्ती..एक नाटुकल

देशभक्ती ...एक नाटुकल

पक्या : देशभक्त ज्ञानी
मन्या : कुतूहलीत देशभक्त


पक्या : मन्या लेका कायतर केल पाहिजे लका,(मावा खून थुंकत ) आपल्या देशाची किंमत नाय हेनला !
मन्या : म्हणजे ओ दादा ! (सिगारेट पेटवत )
पक्या : अरे मंदाट्या,ह्या चड्ड्या घालून फिरणाऱ्या पोरी ! (गोगल वर सरकवत पार मुलगी दिसेना होते तोवर बघत )

मन्या : लय भारी दिसत्यात नाय दादा (लाजत)
पक्या : अरे काळ्या ते न्हायी रे ..या पोरींनी देशाची पार अब्रू घालवली हाय बघ.कश्या वागत्यात काय फिरत्यात !

मन्या :भाऊ खरय बघा ..
पक्या : लेका तिथ सैनिक जीव देतायत आणि या सेल्फी घेतात ! देशभक्ती च काय हाय का नाय !
मन्या : होय दादा,यांना सगळ्यांनी मिळून शिकवायलाच पाहिजे,मारू काय किक ?
मन्या : पण तेनला सांगायचं काय ?
पक्या : सांगायचं ! दोन द्यायच्या ठेऊन ...साधा चुडीदार घालून टिकली लाऊन आलीस तर ठीक (ढुंगणावर घसरलेली गुध्यावर फाडलेली  जीन्स  वर घेत)

मन्या : मग तर आपल्या दादा गैंग च्या कोण वाऱ्याला पण याच नाय
पक्या : येत्या १५ ऑगस्ट ला गैंग ची पोर घेऊन बायिक राली काढू तिरंगा घेऊन,या सगळ्या स्कुटी वाल्या नाही आल्या न टाकीत साखर टाकायची

मन्या :होय दाद्या , एक दिवस देशाचा तिरंगा फिरवायला काय जातंय याचं रोज बॉयफ्रेंड ला घेऊन फिरत्यात कि !

पक्या : कोलेज च्या प्राचार्याला पण वाढायचा बघ,बेन गदारिंग ला एन्ट्री देत नव्हत ते पण मला ! च्या मारी गेली ६ वर्ष माझा GS हाय हे काल आलाय अन मला अडवतय !

मन्या : अगा यायायाया ...फुल राडा करायचा कि ...पेट्रोल च  कस पण ! फुकट वतल नाय तर यायची नायीत पोर

पक्या : भाऊ कशाला आहेत ..अरे पक्षाची ओर्डर आहे १५ ऑगस्ट ला रिपब्लिक डे जोरात करायचा म्हणून

मन्या : मंग आपण तर फुल व्हाईट कुर्ता फेटा विषय हार्ड !
पक्या : हेकन्या,कामाला लाग नटायच नको बघू लगेच ..
मन्या : जातो दादा कोलेजवर,हवा करतो..
पक्या : थांब,आधी ४ मावा पार्सल आन नंद्याकडून



















Comments

Popular posts from this blog

"संप करायाचे संस्कार"

आम्ही कशाला!!!

Shabd saath