थापाड्यांच्या दरबाराचे थापाडेसे बोल
थापाड्यांच्या दरबाराचे थापाडेसे बोल
थापाड्याच्या दरबाराचे थापाडेसे बोल
निवडणुकीचे सोंग उतरता यांचा दिसतो डौल
म्हणे ,
शेतकऱ्यांच राज्य आमचं शेतकऱ्यांच्या साठी
ज्याच खाऊन मोठे झाले खंजीर त्यांच्याच पाठी !
उथळ माथ्याने आरोप करतात त्यांनी अस केल
बड्या धेंडांच कर्ज इथच कुणी हो माफ केल ??
मतदान संपल खुर्ची रुतली आता न आमचे मोल
थापाड्याच्या दरबाराचे थापाडेसे बोल
digital केलात म्हणे भारत, mobile ने होते का शेती?
नोटा केल्यात बंद तेंव्हा भाज्याची वाटली का भीती ?
अक्कल दाखवत मागता खुशाल आमच्या जगण्याची खात्री
तुम्हाला काय कळणार पिक खातात गारांच्या रात्री !
कर्ज देतो मरण आवर अरे तुला कळतो का इथला भूगोल
थापाड्याच्या दरबाराचे थापाडेसे बोल
कर्ज तरी आमचं कुठलं तेही वशिल्यान मिळत
आम्ही जातो मागाय तवा कागदात आम्हाला गुंडळत
लेक वयात येते तसं काळीज भरून येत
वांझोटस रान बघून गुमान फाशी घेत
पिक आले कि दर पाडतोस,स्वस्त केला शहरात सांगतोस
मढ्यावरती आमच्या नुसते अनुदानाचे उरती गोल
थापाड्याच्या दरबाराचे थापाडेसे बोल
७० वर्षाच सांगू नकोस तू तरी काय रे केलं
जेवढे आम्हास लागत होते त्याच तर
तू धर्मकार्य केल !
हजारो कोटी कुभं मेळ्यास उरलं मल्ल्या ने नेल
तुझ्यामागून चांगल काम नाम , पाणी फौन्डेशन ने केल
तुझा तर यात काय दोष बुडाखालच्या सत्तेत असतो हा झोल
थापाड्याच्या दरबाराचे थापाडेसे बोल
GST चे कौतुक करतोस हमिभावाला फाटे दोन
MOLL मधेच चालतात कार्ड आमच्या वांग्याला वाली कोण
?
विकास म्हणजे पोस्टर नव्हे न तुझा दिलेला शब्द
जाहिरातीच्या खर्चात तुझ्यालाखो शेतांचा खर्च
आमचाच ना रे पैसा तो ? आमच्याच साठी का चर्चा सखोल
थापाड्याच्या दरबाराचे थापाडेसे बोल
परदेशाच्या वाऱ्या करता तिथलाही हमीभाव बघा
साचून कुजला कांदा बघून माणुसकीन वागा
उद्योग करा मेट्रो करा अर्बोत निधी वाटा
ताटामध्ये भाकरी येते त्यात नसतो अंबानी टाटा
त्यात आमचा घाम असतो असते आमची मेहनत
डबल दराने तुझ्यासाठी घालतो अव्वल दर्जाच खत
बसुमती,फुले प्रगती ...दरानेच खाल्ले सोल
थापाड्याच्या दरबाराचे थापाडेसे बोल
शेतकऱ्याला कर्जमाफी तर
मिळायलाच हवी सोबतच हमीभाव निश्चिती च विधेयक पास करायला हवे, मी कोरिया देशात
बघतोय आजवर एकही खाद्यपदार्थाचे दर वर खाली झाले नाहीत.इथ शेतीमाल उचलण्याची
जबादारी कंपन्या घेतात.त्यामुळे शेतकऱ्याचा मालाची वाहतूक करण्याचा व विकण्याचा
प्रश्न येत नाही.चार MOBILE APPLICATIONS वाटून काय नाही होणार शेतीच DIGITALAZATION व्हायला हव.उद्योग समूहांवर शेतीमाल उचलण्याची
बंधने घालावी लागतील.उत्पादन वाढण्याचा व दर घटण्याचा काल तसा ठराविक असतो तरीही
जाणून बुजून याकडे कानाडोळा केला जातो.सरकार कोणतही असो आपला फक्त प्रगती शी
संबंध,अपेक्षा नाही केल्या पूर्ण तर आम्ही मतातून बोलूच.
शेतकरी
आत्महत्या ची कारणे संपूर्णता कर्जाशी जोडलेली आहेत अस नाही उलट राजकीय वरदहस्त
असणाऱ्या व वशिला असणाऱ्यानाच कर्ज भेटत असतात.त्यामुळे कर्जमाफी हा काही ठोस इलाज
नाही.शेतकरी मोफत विमा योजना,आरोग्य
योजना,विवाह सहाय योजना असे काही अभिनव पर्याय करावे लागतील अथवा सरकारी सामुहिक विवाह
योजना कारण बहुतांश आत्महत्या मुलीचे लग्नाचे खर्चासाठी होताना दिसून येतात.नाम पाणी
सारख्या स्वयंसेवी संस्थाना भरगोस अर्थसहाय्य दिल जाव.gas अनुदान जस परत मागवल तसं
शेतकरी कन्या शिक्षण कर (ऐछीक) सुरु करण्यात यावा तो शहरी भागातून उच्चभ्रू
लोकांना बंधनकारक असावा.अजून बरच करता येऊ शकेल हवी फक्त इच्छाशक्ती .....
-अजय निंबाळकर
Comments
Post a Comment