आठवणी

कधी कधी अचानक येणाऱ्या तुझ्या आठवणी मनाचे चारही कोपरे शोधुन तुझा अंश अंश पुन्हा उजळुन नवा करुन जातात

तुझी माझी पहीली भेट, मनास भिडलेली ती नजर थेटतुझे सलग ते १४ नकार माझे विनवणीचे नाना प्रकार तुला दिलेली पुस्तकं अन् माझ्या त्या कवितांच्या वह्यातु मागे गिरवलेल्या माझ्याच  आडनावाच्या त्या नव्या सह्या
हे सारंच आठवत जात समोर नकळत उंभ राहतं मग अंधाराचे पडदे हटतात, जिवनपटाला मागे नेतात एक एक क्षण पुन्हा नव्याने दाखवत ...स्वप्नांचे असे चित्रपट
होतात

कधी कधी अचानक येणाऱ्या तुझ्या आठवणी ...

तुला आठवतात ती मोगऱ्याची फुलं ?? मी हाताने हेलकावलेली कानामधली झुलं?तासभर उभे राहुन , मला नव्हे तर जगास पाहुन काॅलेज मधे मारलेल्या त्या गप्पा तुला हासवत खुमारलेल्या माझ्या हजारो थापा
सारंच दिसु लागलं की मन परत त्या एकामाग एक कविता वाचुन घेतं जिच्यावर फक्त तुझाच हक्क असतो..त्यांचा प्रत्येक शब्द शब्द मला नव्याने तुझं होवु देतात जगात स्वप्नंच ती काय जिथं माणसं सुखी
होतात?

कधी कधी अचानक येणाऱ्या तुझ्या आठवणी ...

मावळतीला झुकता झुकता त्यांच्या छंटांचा गोंधळ होतोआपली शेवटची भेट दिसते अन् माझ्या मनाचा कडेलोट होतोधावतो मग मी...सैरा वैरा ...दारं वाजवत मनाचे चारही कोपरे धडकुन घेतोमग
सार्या स्वप्नांची किरणे होतात..तुझी वचने काणी येतात...मी जागा होतो...
पेन घेतो

तुला कवितेत लिहुन
घेतो..पानं पानं स्पर्शुन घेतो
...
रोज कळतंच नाही मला..माझ्या रात्री नेमक्या कुठे जातात
कधी कधी अचानक येणाऱ्या तुझ्या आठवणी मनाचे चारही कोपरे शोधुन तुझा अंश अंश पुन्हा उजळुन नवा करुन जातात




                        - अजय निंबाळकर 

Comments

Popular posts from this blog

"संप करायाचे संस्कार"

आम्ही कशाला!!!

Shabd saath