"संप करायाचे संस्कार"

"संप कारायाचे संस्कार"
पुणे : इंधन दरवाढीविरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक, कुमठेवर रस्त्यावर पीएमपी बस फोडली.


मला नेमकं कळतंच नाही कीभारतीय पक्षांना सार्वजनिक मालमत्ता उद्ध्वस्त झाल्याशिवाय संप यशस्वी झाल्यासारखंवाटतंच नाही. मग त्यात कॉंग्रेस , भाजप, डावे, उजवे, करणी , मोर्चे सारेच आले. जगभराला अहिंसेचा संदेश देणारा आपला भारत आणी त्याच भारतात होणारी ही उघड उघड हिंसा, दोन्ही किती विसंगत आहे. वाईट या गोष्टीच वाटत राहते कि आम्ही आपल्याच देशाचं वाटोळ करून आपल्या मागण्या मान्य करून घेण्याची अपेक्षा करत असतो.मागण्या तरी काय असतात? चित्रपट प्रदर्शित होवू नये , पेट्रोल दरवाढकमी व्हावी, अमुक जातीला आरक्षण मिळावे, तमुक वर्गाला संरक्षण भेटावं आणि नाना प्रकार. या सर्व मागण्या मागतो तरी कोण ज्याने हि सरकारे निवडून आणलेली असतात. बरं मग सरकार तुम्ही निवडून आणता,कर तुम्ही भरता मग याच करातून झेलेल्या जानसुविधांची वाताहत करून नेमका कोणाचा व कसला फायदा होतो ? बरे तुम्ही मतदानातून रोष व्यक्त करू शकता, असहकारातून व्यक्त करू शकता, उपोषणातून करू शकता, फक्त रस्त्यावर मुके एकत्र येऊनपण करू शकता व शंखनाद करून सरकारच्या कानठळ्या देखील बसवू शकता. कारण तुम्ही १३३कोटी आहात आणी ते जेमतेम पाच-पन्नास हजार.

            आता मी काही जपान, अमेरिकेत कसे संप झाले याच कौतुकी वर्णन करून आपल्याला पटवून द्यावे आणि लगेच आपण तसे अनुकरण करावे  इतका ना मी गांधी आहे न तुम्ही तितके सजग नागरिक. देश म्हणून आपण जे करायला हवे ते एकदा जरी केले असते तर त्याच देशात असाविध्वंस माजवणे एक वेळ मान्य असते.आज जे बस फोडत आहेत यांनी कधी बस स्थानकावरील कचरापेटीत कचरा टाकला नसेल, उलट पानाची पिचकारी मात्र हमखास उठवली असेल. रेल्वेत दगड फेकून मारणाऱ्याने कधी रेल्वे थाबली म्हणून शौचालयास जाने थांबवले नसेल. सरकारी इमारतीच्या काचा फोडनाऱ्यानी कधी १५ ऑगस्ट ला ध्वजारोहण केलं नसेल. तर आम्ही हे करतो कुणासाठी ? एक नेता टीव्हीवर जोरजोराने ओरडला, कुणी तुमची आस्था असलेल्या पण त्याबद्दल नाव वगळता चकार माहिती नसलेल्या महापुरषाबद्दल वाईट शब्द उद्गारले, कुणी पुतळे विटंबले कि झाले आमचा जुलूस रस्त्याने दिसेल त्या गोष्टीवर तुटून पडतो.त्यात छोटे दुकानदार आले, गाडी वाले आले , भाजीविक्रेते आले. एकूणच काय कि ज्यांनी याच संपाचे अनावरण केले त्या बड्या धेंडांची घरे, कंपन्या वगळून, कार्यालये वगळून, आपणच आपल्या वस्तू माणसांची अशी विदारक स्तिथी करतो. यावर कुणी हिंदुना विचारलं तर ते मुस्लीम दंग्याकडे बोट करत म्हणतात त्यांनी केले तेंव्हा का गप्प होता? आणी मुस्लिमांना म्हणलं तर तेही असेच. एकूणच काय १३३ कोटी लो १३३ कोटीलो कांचे या न त्या करणे असे काही शत्रुत्वाचे नाते बवून घेतात कि दर महिना एक तरी गट दुखावला जातो आणि नुकसान होते तेही १३३ कोटी लोकांचे.असेच करत राहिलो तर आपला देश उठ सुठ देशांतर्गत कलहामुळे सेव्हियत युनियनच्या धर्तीवर विभाजीला जाईल व हिंसेच्या याच स्वरूपाने रौद्र रूप धरण केल्याने तालिबान बनेल. याला कारण जरी नेते असले तरी खरे कर्ते मात्र १३३ कोटी लोक असतील. कुणीपण नेता आज संप म्हणून माध्यमांसमोर दिवसभर भुंकत राहतो. कुठे जात, कुठे धर्म, कुठे गाय, कुठे मंदिर अशी नाना करणे दाखवत समाजात तेढ निर्माण करत आपली पोळी आपसूक भाजून घेतो. पुन्हा निवडणुका येत विकासाच्या मार्गावर आपण कसे चालले पाहिजे असे संत विचार धारण करून आपल्याला गाढव बनवतो. हे थांबायला हवे.

कधीतरी आपण स्वताला हे विचारायला हवे कि आपण त्याच भारतात राहतो काय कि ज्याने असहकार करून घरबसल्या इंग्रजांना जेरीस आणले होते? आपण तेच भारतीय आहोत का ज्यांनी मिठाचा कर बंद करायला ४२५ किलोमीटर चालून इंग्रजांचा जाचक कर मातीमोल केला होता? तेच जर आपण भारतीय असू तर आपणच निवडून दिल्या सरकारकडे मागणी मागताना आपण देशाच्या मालमत्तेचा विध्वंस का करतो आहोत ?? आज पेट्रोल महाग झाले आहे. सरकारने आकारलेला जाचक कर याचे कारण आहे हे मान्य, परंतु सरकारी बस फोडून दर जरी कमी झाले तरी ती फुटलेली काच आपल्याच नागरिकाला लागून जखम करेल वा तीच दुरुस्त करता आपल्याच करतील पैसा वापरला जाईल ज्याने नवीन बस घेण्याची तरतूद रद्द करावी लागेल. सर्वच काचा फोडणारे सुशिक्षित आहेत असेही नाही परंतु आज भारतात  शिकलेल्या लोकांची संख्या अधिक आहे पण त्यांचा "माझं काय जातंय" हा दृष्टीकोन या गोष्टींना एकप्रकारे प्रोत्साहन देतोय. आपण सर्वांनी एकत्र येऊनच  असे नाही पण आपापल्यात व्यक्त होऊन या गोष्टीची जागृती करायला हवी. लोकशाहीत जगतोय आपण , आपली ताकद अफाट आहे ती  वापरायला हवी

आम्ही गर्दीचे मालक आहोत
आम्ही गर्दीचे मालक आहोत
आमचा
आवाज तुमचे कान फोडेल
आम्ही
ना गोंगाट करू
न फोडू खिडक्या बसेस च्या
पण
आम्ही एक होऊन गदा आणू
तुमच्या सिंहासनावर वर
आम्ही गर्दीची भाषा आहोत
आमचे
लिखाण तुमचे डोळे दिपविल
आम्ही शस्त्र हाती घेणार नाही
न
पेटवणार दुकाने, गावे ,शहरे
पण
स्याहीने शाही चा संहार करू
आम्हीच गर्दीचे हात आहोत
आमच्या
मुठी तुमचे सरकार पडतील
आम्ही
जात धर्म कशात विभाग्णार नाही
पण
दिल्या कारच्या एक एक रुपयाचा
एकमुठीने हिशेब करू
आम्ही म्हणजेच गर्दी आहोत
आम्हीच
आहोत इथल्या बसेस, रस्ते, दुकाने, गाड्या, वस्त्यांपासून संसदेपर्यंत साऱ्या देशाचे सार्वभौम मालक , राजे , कर्ते ...
तुम्ही आम्हला घाबरायला हवं
आमच्या
मागणीला धास्तीने पुरे करायला हव ..
अन्यथा ..
आम्हीच बनू खुर्चीत ...आणि तुम्हाला हमाल करू
आम्ही गर्दीचे मालक आहोत
-अजय निंबाळकर

Comments

Popular posts from this blog

आम्ही कशाला!!!

Shabd saath