असहकार

महान असे विचार प्रवाहित करणारे ४० कोटी महान  भारतीय महान होण विसरलेत ...


                     भारताच्या स्वातंत्र्य प्राप्ती पर्यंतच्या भारतात महात्मा गांधी होते,आधी लोकमान्य  टिळक होते,भगतसिंग ,चंद्रशेखर आझाद...असे बरेच महान नेते होते ,क्रांतिकारी होते म्हणून देश स्वतंत्र झाला हे जरी खर असला तरी माझ मत सांगू...

                      महान विचार सांगणे सोप आहे पण एकमताने तो एक महान विचार प्रवाहित ठेवण महाकठीण.माझ्या मते १९०५ ते 19४७ काळातील प्रत्येक नागरिक देशासाठी महानच होता.१९२० ला एकटे बापू म्हणाले म्हणून ३३ कोटी लोक असहाकारावर उतरले विलायती मालावर असा काही बहिष्कार टाकला की इंग्रज सरकारला तोंड दाबून बुक्क्यांचा मार बसला...पण एक साधी गोष्ट ध्यानात घ्या की असहकार एका गांधी किंवा कॉंग्रेस ने केला असता तर! तर  ही चळवळ इतिहासाने सुद्धा वगळली असती.महान अश्या ३३ कोटी भारतीयांनी देशभावना व देशभक्ती दाखवत जगाला एक आदर्श घालून दिला. अगदी चलेजाव च्या वेळेस असो वां १८५७च्या उठावात असो खरी क्रांती महान जनतेन केली आहे.अहिंसेच आणि सत्याग्रहाच तत्वज्ञान हे बापूनी मांडले हे जगजाहीर आहे पण त्याच अनुकरण करत भारत स्वतंत्र झाला तो त्या ४० कोटी महान भारतीयांमुळे.

                    आज परिस्थिती उलट आहे आज मोदींच्या सत्ता येण्यामध्ये जनतेचा जागृतपणा जरी भासला असला तरी सखोल तत्वज्ञानाला बगल देत लोक हे भाप्क्या व तात्कालिक गोष्टीनां भुलत आहेत हे हि तितकंच दिसून आल .हो भापक्या म्हणतोय कारण आज भारतात पाकिस्तानी कलाकार असावेत का नसावेत म्हणून दोन मतप्रवाह झालेत ते हि २२ जवान शहीद झाल्यानंतर अन रोज एक वाढतोय हे हि दुर्दैव. ज्या भारताला असहकार चळवळीचा इतका गौरवी इतिहास आहे. त्याच भारताचे लोक आपल्या जवानांच्या वीरगती विसरून हौसेन या भडखाऊ टुकार आणि कोत्या फायादेखोर ढोंगी लोकांना त्यांचे चित्रपट, गाणी,शो बघून नकळत त्यांची पाठराखण करत आहेत,आज अशा दलालंचे चित्रपट लोक नालायक पणे बघायला जातातच कसे?? हो जातात कारण ते महानत्व विसरलेत.
                     मी परदेशात राहतोय माझा अनुभव सांगू तर पाकिस्तानी गटासोबत गाण्याच्या भेंड्या सुद्धा खेळून पहिल्यात मी त्यांच्या कडे सुद्धा लता, किशोर ,रफी ,उदित ,सोनू ...यांच्याशिवाय पर्याय नाही. मग आताचे हे भडवे भांडवली चित्रपट निर्माते फक्त पाकिस्तान मध्ये होणाऱ्या धंद्याचा विचार करून त्यांच्या कलाकारांना वैशेवाहिक पणे संधी देतात आणि आम्ही १३० कोटी भारतीय त्यांना प्रोत्साहन देत भारतात असल्या गुणी कलाकारांच्यावर सरळ सरळ इंगर्जी अत्याचार करतो.दोष त्यांचा नाही तुमचा आहे माझा आहे...आपण महान होण विसरलोय महान विचार तुम्बलेत त्यांना प्रव्हीत करा... महान बना माझ्या भावाबाहीनिनो...देश आपला आहे आपण महान तर देश महान..करा यल्गार ...होऊदे असहकार.


आज निषेध करणाराच उद्या पहिला खेळ पाहिल!
सीमेवरती जवान मरूदे ,यांचा चित्रपट 100 कोटी ला जायील !

२२ मेले  हाच आकडा २२०० वर जायील 
सीमा मजबूत करतोय भारत ,.. घरचा भेदीच मात देयील !

वेळीच व्हा जागे भारतीयांनो !
मातृभ्क्तीने करा ललकार 

चला करूया अशा भाडखाउंच्या चित्रपटांशी असहकार..




जय हिंद 


मी एक महान भारतीय  कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराचा चित्रपट पाहणार नाही हा माझा असहकार आहे .



                                    - अजय निंबाळकर 
                                 तुम्ही केंव्हा महान होता ??? 






                 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

"संप करायाचे संस्कार"

आम्ही कशाला!!!

Shabd saath