आदिलशाही




गर्दीसुद्धा आता वारशाने जमु लागली
हा ह्या तो त्या घराण्याचा म्हणुण यांची हवा घुमू लागली...!

लोकशाहीच्या सत्तास्थानी गांधी,ठाकरे ,पवार,फडणवीस
आणि बर्याच आडनावांची नांदी रूजु लागली ....!

अध्यक्षांची खुर्ची ज्ञान क्षमता सोडुन फक्त क्षमताहीन पुतण्या,पुत्र
आणि पुत्री भोवतीच फिरू लागली..!


चले जाव ...या एका हाकेवर संपला इंग्रज..!
तिच ही गर्दी तिच्याच आवाजाला मुकू लागली.

कधिकाळी रस्त्यावर न्याय भांडुन उपोषणात मिळायचा गांधी
आता त्यांच्याच आडनावाची entry हेलेकाॅप्टरातुन घडु लागली

प्रामाणिक कष्ट गेले खड्ड्यात ...!
नैतिकतेची वाट लावत
पुरोगामी म्हणवनारेंचीपण आंडी इथंच शिजु लागली

गल्ली दिल्ली चौक आणि शहरं

घराणेशाही जिथं तिथं तग धरू लागली

अरे उघडा डोळे

लोकशाहीचा धरुन पदर
आदिलशाही पुण्हा आपली पावलं पेरू लागली



अजय निंबाळकर 


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

"संप करायाचे संस्कार"

आम्ही कशाला!!!

Shabd saath