ध्येय

ध्येय


चालुन वाट भटकी झिजलीत पायताने

स्वप्नापल्याड तरीही चालायचेच आहे


मरण्या अधिच असते जगण्या तुझे तराणे
हरलेत श्वास तरिही बोलायचेच आहे 


विजया समिप केव्हा पोहचेन कोण जाने 
प्रत्येक दु:ख तरिही झेलायचेच आहे 


हैराणसे मलाही जर केलेच जोखडाणे  
माझा कणा म्हणे हे पेलायचेच आहे 

अजय निंबाळकर

Comments

Popular posts from this blog

"संप करायाचे संस्कार"

आम्ही कशाला!!!

Shabd saath