"संप करायाचे संस्कार"
" संप कारायाचे संस्कार" पुणे : इंधन दरवाढीविरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक , कुमठेवर रस्त्यावर पीएमपी बस फोडली. मला नेमकं कळतंच नाही कीभारतीय पक्षांना सार्वजनिक मालमत्ता उद्ध्वस्त झाल्याशिवाय संप यशस्वी झाल्यासारखंवाटतंच नाही. मग त्यात कॉंग्रेस , भाजप , डावे , उजवे , करणी , मोर्चे सारेच आले. जगभराला अहिंसेचा संदेश देणारा आपला भारत आणी त्याच भारतात होणारी ही उघड उघड हिंसा , दोन्ही किती विसंगत आहे. वाईट या गोष्टीच वाटत राहते कि आम्ही आपल्याच देशाचं वाटोळ करून आपल्या मागण्या मान्य करून घेण्याची अपेक्षा करत असतो.मागण्या तरी काय असतात ? चित्रपट प्रदर्शित होवू नये , पेट्रोल दरवाढकमी व्हावी , अमुक जातीला आरक्षण मिळावे , तमुक वर्गाला संरक्षण भेटावं आणि नाना प्रकार. या सर्व मागण्या मागतो तरी कोण ज्याने हि सरकारे निवडून आणलेली असतात . ब रं मग सरकार तुम्ही निवडून आणता , कर तुम्ही भरता मग याच करातून झेलेल्या जानसुविधांची वाताहत करून नेमका कोणाचा व कसला फायदा होतो ? बरे तुम्ही मतदानातून रोष व्यक्त करू शकता , असहकारातून व्यक्त करू शकता , उपोषणा...

Comments
Post a Comment