Transcript
18 नोव्हेंबर 1962 रोजी शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली. तळागाळातील, गोरगरीब विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाची गंगा प्रवाहित व्हावी हा शिवाजी विद्यापीठ स्थापन करणेच मूळ उद्देश होता आहे यापुढेही राहील. साहजिकच छत्रपतींच्या नावाने सुरु झालेल्या आपल्या विद्यापीठाची वाटचाल देखील उल्लेखनीय आणि अभिमान वाटावी अशीच आहे. नुकतेच ‘नॅक’ (बंगळूर) यांच्यातर्फे करण्यात आलेल्या तिसऱ्या पुनर्मूल्यांकनात शिवाजी विद्यापीठ 3.16 सीजीपीए गुणांकनासह महाराष्ट्रातील सर्वाधिक अग्रमानांकित विद्यापीठ ठरले आहे. कोल्हापूर ,सांगली, सातारा परिसरातील विद्यार्थ्यांच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीची विद्यापीठ प्रशासनाला सुरुवातीपासूनच जाणीव राहिली आहे, ती आजही कायम असावी . केवळ पैशाअभावी विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी नाकारली जाऊ नये म्हणून अतिशय अल्प अथवा माफक शुल्कामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयीसुविधा उपलब्ध करण्याकडे विद्यापीठाचा आजही कल आहे. मला या विद्यापीठातून माझी पदवी घेतल्याचा सार्थ अभिमान आहे आणि तो कोणाला नसेल, छत्रपतींच्या नावाचा उल्लेख असणारी पदवी जगात दुसरीकडे कोठेही प्राप्त होत नाही. आता तर विद्यापीठाने सर्वच प्रकारच्या संशोधनात अगदी अमेरिका , युरोप , ऑस्ट्रलिया इथवर आपला ठसा उमठवात अगदी अटकेपार आपले झेंडे फडकावले आहेत. या यशाचं श्रेय हे इथल्या प्राध्यापकांचं, विद्यार्थ्यांचं,सर्व प्रशासकीय अधिकारीवर्ग आणि कर्मचाऱ्यांचं देखील. आज आमच्यासारखी हजारो शेतकरी बहुजनांची मुलं परदेशात शिक्षण घेतायेत ते फक शिवाजी विद्यापीठ आहे म्हणूनच.
याउपर अजूनही काही गोष्टी अशा आहेत कि जिथं अजून लक्ष देण्याची व विध्यार्थ्यांना अधिक सुविधा मिळवून देण्याची गरज आहे. मागच्या आठवड्यात आपल्या विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे माझ्याशी बोलणे झाले. अतिशय आनंदाने तो मला सांगत होता कि दक्षिण कोरियाच्या एका नामांकित विध्यापीठातील प्राध्यापकाने त्याला त्याचा प्रबंध व इतर माहिती पाहून विद्यापीठात विदयावेतनासहित पुढील शिक्षण करण्याची संधी दिली. प्रवेशाची माहिती विचारण्यासाठी म्हणून त्याने मला संपर्क केला होता. मी माहिती घेऊन त्याला ताबडतोब अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायला सांगितले, प्रवेश शुल्क मी भरतो परंतु तू आधी सर्व कागदपत्रे जमा करून १७एप्रिल च्या आत ऑनलाईन भरून घे नाहीतर पुन्हा संधी येईल असे नाही असे सांगितले . त्यानंतर दोनच दिवसानी मला त्याचा परत फोन आला , कारण होते परदेशी प्रवेशासाठी लागणारे अत्यंत महत्वाचे कागदपत्र म्हणजे "ट्रान्सक्रिप्ट". जगात कोणत्याही विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी या कागदपत्राची गरज असते. हे ट्रान्सक्रिप्ट म्हणजे नेमकं असत तरी काय? तर फार काही गूढ असे अजिबात नाही. हे आपल्या संपूर्ण पदवी कालावधीतील परीक्षांच्या मार्कलिस्टचा एकत्रित प्रमाणित संच असतो. ज्यावर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा शिक्का असतो. आता तर आपले सर्व निकाल हि PRN प्रणाली मुळे एका क्लिक मध्ये उपलब्ध होतात, त्यांचं एकत्रीकरण करायला लागेल तो वेळ असा किती ? आणि त्याची प्रत असेल तरी कितीला ?
तुम्ही म्हणाल एका कागदाबद्दल हा माणूस इतकं पूर्ण का मांडतोय! तर याला कारण त्याचा आलेला फोन. फोनवर बिचारा अतिशय खिन्न स्वरात बोलत होता."सर मी पुढच्या सत्रात प्रवेश घेतो ". मी म्हणलं "अरे, असे का अचानक ? काही पैश्याची अडचण ? ...घाबरू नको सांग..मलाही कोणीतरी मदत केली म्हणून मी इथं आहे . तो म्हणाला " पैसे तर आहेच पण केवळ पैसे देखील माझा प्रश्न नाहीत सोडवू शकणार. सर, ट्रान्सक्रिप्ट साठी अर्ज भरायला गेलो तर ते म्हणले दोन प्रकारात ट्रान्सक्रिप्ट भेटते. पाहिलं म्हणजे नियमित कालावधी ३० दिवस (याहून वाढूही शकते )याची फी असते २०००रुपये आणि दुसरे म्हणजे तात्काळ ज्याची असते ८००० रुपये (कमीत कमी १० दिवसात ). या हिशेबी मला या सत्रात प्रवेश मिळणे हे अशक्यच. " त्याचे बोलणे ऐकून तोच काय मीही हताश झालो. मलाही माझ्या प्रवेशाची वेळ आठवली .
आज कदाचित त्या विद्यार्थ्यांची सुवर्ण संधी हरवली हि पैसे आणि अव्यवस्थेमुळेच. हो मी हे ठामपणे म्हणतोय कारण मी इथल्या विद्यापीठात ट्रान्सक्रिप्ट प्रक्रियेची चौकशी केली तर ते म्हणले ट्रान्सक्रिप्ट ऑनलाईन भेटत तेही मोफत एका क्लीक वरती . त्यावर विद्यापीठाचा शिक्का घेतला कि झालं . मग मात्र मन राहून राहून त्या विद्यार्थ्यांची आठवण करू लागले आणि मग पेन हाती घेतला.
आज आपल्या विद्यापीठात सर्व कामकाज भले ऑनलाईन होत नसले तरी आपले निकाल ऑनलाईन भेटतात मग या ट्रान्सक्रिप्ट साठी इतकी भरमसाठ फीस हि कशासाठी ? वरती हे प्राप्त करण्यासाठी लागणार कालावधी साधारण २ महिन्यांचा ! परदेशात शिक्षण घेण्यासाठी फक्त श्रीमंत घरची मुले जातात असा तर प्रशासनाचा गैरसमज नाही ना झाला ? असेल तर त्यांना सांगायला हवे कि विद्यावेतना सोबत विमान भाडे देखील काही विद्यापीठे पुरवीत असतात . पुढे हेच विध्यार्थी आपल्या विद्यापीठाचा नावलौकिक करत असतात शिवाय विद्यापीठाच्या मानांकनात देखील भर घालत असतात . मग विद्यापीठाने देखील या विद्यार्थ्यांचा विचार करणे गरजेचे नाही का ?
प्रशासन म्हणलं कि अडचणी आल्या , त्याही आपण गृहीत धरुयात परंतु ट्रान्सक्रिप्ट सारख्या जलद गतीने गरज असणारे कागदपत्र मिळवण्यासाठी विद्यापीठाने एक स्वतंत्र ऑनलाईन विभाग सुरु केला तर विध्यार्थी वर्गासाठी हे निश्चितच फलदायी ठरेल. त्यावेळी यावर भाष्य करणे मला जमले नव्हते परंतु आज अजून एकाची संधी गेली (अशा आजवर कितीतरी जणांच्या गेल्या असतीलही) ती येत्या काळात जायला नको म्हणून हा आटापिटा. सर्वच विध्यार्थी पालक प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवायला हवा व लवकरात लवकर गोरगरीब विद्यार्थ्यांच्या जीवनात परदेशातील शिक्षणाची गंगा देखील प्रवाहित व्हावी हाच या छोटेखानी तक्रारनाम्याचा हेतू.
कळावे,
आपला नम्र
अजय निंबाळकर

दूर माळावर असलेल्या दूरशिक्षण विभागात मीही तात्काळ ट्रान्सक्रिप्ट साठी अर्ज केला होता आणि दहा म्हणता १६ दिवसांनी माझे ट्रान्सक्रिप्ट भेटले होते आणि त्यामागोमाग माझे ७ महिने वाया गेले होते. पुन्हा मे पासून मार्च पर्यंत मी वाट पहिली आणि मग मला प्रवेश भेटला होता. पण तो भेटला म्हणजे ते प्राध्यापक देखील ७ महिने थांबले म्हणून. नसते थांबले असते तर कदाचित मी कोणत्यातरी केमिकल कंपनीत काम करत असतो. आज हे परत आठवलं आणि म्हणलं नाही आपल्या विद्यापीठाचा आपल्याला सार्थ अभिमान आहे , परंतु आपण जर नेहमी चांगल्याच बाबींचा उदोउदो करीत विद्यापीठातील काही कटू गोष्टी झाकत राहिलो तर छत्रपतींच्या नावाने असल्या माझ्या विध्यापीठचे कुठंतरी नुकसानच होईल.
आज कदाचित त्या विद्यार्थ्यांची सुवर्ण संधी हरवली हि पैसे आणि अव्यवस्थेमुळेच. हो मी हे ठामपणे म्हणतोय कारण मी इथल्या विद्यापीठात ट्रान्सक्रिप्ट प्रक्रियेची चौकशी केली तर ते म्हणले ट्रान्सक्रिप्ट ऑनलाईन भेटत तेही मोफत एका क्लीक वरती . त्यावर विद्यापीठाचा शिक्का घेतला कि झालं . मग मात्र मन राहून राहून त्या विद्यार्थ्यांची आठवण करू लागले आणि मग पेन हाती घेतला.
आज आपल्या विद्यापीठात सर्व कामकाज भले ऑनलाईन होत नसले तरी आपले निकाल ऑनलाईन भेटतात मग या ट्रान्सक्रिप्ट साठी इतकी भरमसाठ फीस हि कशासाठी ? वरती हे प्राप्त करण्यासाठी लागणार कालावधी साधारण २ महिन्यांचा ! परदेशात शिक्षण घेण्यासाठी फक्त श्रीमंत घरची मुले जातात असा तर प्रशासनाचा गैरसमज नाही ना झाला ? असेल तर त्यांना सांगायला हवे कि विद्यावेतना सोबत विमान भाडे देखील काही विद्यापीठे पुरवीत असतात . पुढे हेच विध्यार्थी आपल्या विद्यापीठाचा नावलौकिक करत असतात शिवाय विद्यापीठाच्या मानांकनात देखील भर घालत असतात . मग विद्यापीठाने देखील या विद्यार्थ्यांचा विचार करणे गरजेचे नाही का ?
प्रशासन म्हणलं कि अडचणी आल्या , त्याही आपण गृहीत धरुयात परंतु ट्रान्सक्रिप्ट सारख्या जलद गतीने गरज असणारे कागदपत्र मिळवण्यासाठी विद्यापीठाने एक स्वतंत्र ऑनलाईन विभाग सुरु केला तर विध्यार्थी वर्गासाठी हे निश्चितच फलदायी ठरेल. त्यावेळी यावर भाष्य करणे मला जमले नव्हते परंतु आज अजून एकाची संधी गेली (अशा आजवर कितीतरी जणांच्या गेल्या असतीलही) ती येत्या काळात जायला नको म्हणून हा आटापिटा. सर्वच विध्यार्थी पालक प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवायला हवा व लवकरात लवकर गोरगरीब विद्यार्थ्यांच्या जीवनात परदेशातील शिक्षणाची गंगा देखील प्रवाहित व्हावी हाच या छोटेखानी तक्रारनाम्याचा हेतू.
कळावे,
आपला नम्र
अजय निंबाळकर

वास्तव आहे राव हे... त्यासाठी कर्मचारी जबाबदार आहेत... आणि ती System
ReplyDeleteTranscripts chi process easy vhayla pahije.. khup problems yetat admissions chya veli..
ReplyDelete