मोरया

लंबोदर


लंबोदर पितांबर फणिवरधर तुच तु

वार्यावर तार्यांवर सार्यावर तुच 

प्रथमावर अंतावर मंत्रावर तुच तु

मोरया...

मोरया...


तु कविश तुच क्रिती मनोमयी तुच तु

भक्तांचा वाली या जगताचा नाथ तु 


तु प्रमोद तुच पुरुष रुद्रप्रिया तुच तु

तुच सखा तुच दिव्य आणी भव्यहीच तु 

विघ्नांना हरतो जो सुरवरही तुच तु


मोरया 


मोरया ...


सदनातुन वदनातुन भुवनपती तुच तु

ज्ञानाचा तु स्वामी भक्तीचा सुर तु 


वेदातुन गितेतुन श्लोकांचा सार तु

शास्त्रांतुन शस्त्रांतुन भिमरुपहीच तु 

हेरंभा तु प्रचंड आनंदही तुच तु


मोरया....मोरया 


मोरया ..मोरया 


मनमाळु मायाळु मोदकपरी गोड तु

गजवक्रा तु गोंडस बाप्पा आमचाच तु 

श्वेतांबर शांभव अन् सिद्धीप्रिया तुच तु 

हे स्वरुप तु तरुण कारुण्यही तुच तु 

वक्रतुंड महाकाय सर्वकोटी तुच तु 


मोरया... मोरया 


पुजतो तुज भजतो तुज शब्दांवर स्वार तु

तु कलेत तु स्वरात ह्रदयातही तुच तु 

चतुर्भुजा अवनिशा जगस्वामी तुच तु

प्रथमपुज्य देवरता दुर्जाही तुच तु 

मृत्युंजय ओंकारा चित्तेश्वर तुच तु


मोरया... मोरया


-अजय निंबाळकर

Comments

Popular posts from this blog

"संप करायाचे संस्कार"

आम्ही कशाला!!!

Shabd saath