Posts

एका वडाची परवड ....

Image
एका वडाची परवड ....             कधी कधी मातीची खूप आठवण येऊ लागलीना कि मग मी भारताचा नकाशा desktop ला लावतो आणि मनभरून google earth वरती झूम करत करत माझ्या आईच दर्शन घेतो.अगदी काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेला माझा  विशाल भारत डोळ्यात बसवताना त्याच्या महानतेची प्रचीती येते.केवढा आपला देश आपण किती नशीबवान आहोत कारण आपण इथ आहोत.बघा न जगातली सारी वातावारणे एका नकाशात पाहायला मिळतात.वाळवंटही आहे हिमशिखरे देखील  आहेत, खेडी आहेत शहरे हि आहेत,नद्य,तलाव जंगले अरण्ये...अन कित्ती काय.भारताची आठवण आली म्हणून काही हे बोलतोय अस नाही ना दिखाऊ देशभक्तीचे झंझावाती वारेही माझ्या डोक्यात शिरले आहे असेही नाही जे कि घोषणा देऊन व एखाद्याला धमकावून माझ मन अभिमानाने भरून येयील असं देखील अजिबात नाही.हल्ली बातम्यांमध्ये पाहून काळतच आहे भारत महान आहे तितकाच इथल्या काही लोकांचा मेंदू लहान आहे जे काही संकुचित विचारांना मोठ करून संपूर्ण भारतीयत्वाचे झेंडे मिरवताना दिसतात.जाऊदे मला त्या विषयात नाही पडायचं हा तर संपूर्ण भारतीयत्व म्हणजे काय ओ ?घ...

नमस्कार करते हं...!

नमस्कार करते हं...!                १ जानेवारी १८४८ साधारणपणे १७० वर्ष झाली असतील फुल्यांनी स्त्रीशिक्षण आणि समतेची कवाडे खुली केली आणि संस्कृतीच्या नावाखाली जखडलेल्या साखळ्या सैल करत माझी आई ,आजी ,बहिण...लिहिती बोलती झाली.आजवर भारतातल्या  प्रत्येक उच्च पदावर विराजमान होऊन तीनही तीच सामर्थ्य सिद्ध केलय.संसदेत भल्या भल्यांची पुंगी थंड करणाऱ्या  इंदिरा गांधी , सुषमा स्वराज असोत कि अंतराळात सर्वाधिक स्पेस वॉक करणारी सुनिताव कल्पना चावला असो सावित्रीच्या लेकी आज कुठेच मागे नाहीत.जगभरात तर आहेच पण भारतात आज कोणत्याही परीक्षेत मुलींचं उत्तीर्ण होण्याच प्रमाण जास्त आहे पण मी हे अचानक का बोलतोय!          परवाच माझ्या एका मैत्रिणीचा फोन झाला तीच MBA finance झालय,चांगल्या खाजगी कंपनीमध्ये नोकरी करत आहे हाताखाली २-३ ट्रेनी पण आहेत.वय लग्नाच झालय म्हणून मीच गंमत करत तिला म्हणायला गेलो “काय काय,कांदेपोहे झाले कि नाही?” वाक्य संपल न संपल तोच एक मोठा पॉस घेतला तिने अन माझ्याही ...

सूरत बदलनी चाहिए…

सूरत बदलनी चाहिए … भारतीय संविधानाच्या चौथ्या खांबाला सादर प्रणाम ...                                     मी लहान होतो तेंव्हा रोज ७ वाजता टीव्ही वर सात रंगाचे पट्टे यायचे आणि मग घड्याळ अन बरोबर ७ वाजले कि ठरलेल्या त्या संगीत लहरींच्या नंतर सुरु व्हायच्या बातम्या ...          “नमस्कार मी ....... बघुयात आजच्या ठळक घडामोडी ...अशा अतिशय नम्र स्वरात देशातील संवेदनशील अतिसंवेदनशील व तितक्याच बाकीच्या बातम्या हळुवार घरात घुमायच्या . त्यावेळी तर नेते पण किती जबरदस्त होते बाळासाहेब,अटलजी,प्रमोद महाजन,विलासराव ....अजून बरेच.लादेन,सद्दाम दाऊद,छोटा राजन, यासारखे किती भयानक लोकांच्याही बातम्या येत असत.खून तेव्हाही व्हायचेच...दंगली पण झाल्या पण देश खऱ्या अर्थाने सावरला तो लोकशाहीच्या या चौथ्या खांबामुळे......             ...

थापाड्यांच्या दरबाराचे थापाडेसे बोल

थापाड्यांच्या दरबाराचे थापाडेसे बोल थापाड्याच्या दरबाराचे थापाडेसे बोल निवडणुकीचे सोंग उतरता यांचा दिसतो डौल म्हणे , शेतकऱ्यांच राज्य आमचं शेतकऱ्यांच्या साठी ज्याच खाऊन मोठे झाले खंजीर त्यांच्याच पाठी ! उथळ माथ्याने आरोप करतात त्यांनी अस केल बड्या धेंडांच कर्ज इथच कुणी हो माफ केल ?? मतदान संपल खुर्ची रुतली आता न आमचे मोल थापाड्याच्या दरबाराचे थापाडेसे बोल digital केलात म्हणे भारत, mobile ने होते का शेती? नोटा केल्यात बंद तेंव्हा भाज्याची वाटली का भीती ? अक्कल दाखवत मागता खुशाल आमच्या जगण्याची खात्री तुम्हाला काय कळणार पिक खातात गारांच्या रात्री ! कर्ज देतो मरण आवर अरे तुला कळतो का इथला भूगोल थापाड्याच्या दरबाराचे थापाडेसे बोल कर्ज तरी आमचं कुठलं तेही वशिल्यान मिळत आम्ही जातो मागाय तवा कागदात आम्हाला गुंडळत लेक वयात येते तसं काळीज भरून येत वांझोटस रान बघून गुमान फाशी घेत पिक आले कि दर पाडतोस,स्वस्त केला शहरात सांगतोस मढ्यावरती आमच्या नुसते अनुदानाचे उरती गोल थापाड्याच्या दरबाराचे थापाडेसे बोल ७० वर्षाच सांगू नकोस तू तरी क...

लय गरम होतंय राव

Image
image of rotary club green forest project 2011-12....as it is in 2017 ...place shivaji university ...front of distance education center. लय गरम होतंय राव यंदा गरमी परत वाढनार परत झाडांची आठवण येणार घोषणा होणार,अभियान चालणार जुनेच खड्डे नवे होणार पंचायती ला लाखो म्हणे सरकार आपले रोपे देणार काही कागदावर तर काही सेल्फी साठी जुन्याच जागी  हिरवी होणार कलेक्टर,मंत्री कुदळ घेणार काळ्या मातीचे गोडवे गाणार whatsapp facebook नव्याने भरणार झाडे लावाचा मेसेज घुमणार उष्मा वाढणार म्हातारी मारणार चेनल वाले आढावे घेणार आत्महत्या होणार मोर्चे निघणार परत परत हे सारे होणार पण झाड मात्र नाही जागवणार !! झाडे लावायला पाहिजेत लय गरम होतंय राव..हो न !!                         -अजय निंबाळकर

देशभक्ती..एक नाटुकल

देश भ क्ती ... एक नाटुकल पक्या : देशभक्त ज्ञानी मन्या : कुतूहलीत देशभक्त पक्या : मन्या लेका कायतर केल पाहिजे लका,(मावा खून थुंकत ) आपल्या देशाची किंमत नाय हेनला ! मन्या : म्हणजे ओ दादा ! (सिगारेट पेटवत ) पक्या : अरे मंदाट्या,ह्या चड्ड्या घालून फिरणाऱ्या पोरी ! (गोगल वर सरकवत पार मुलगी दिसेना होते तोवर बघत ) मन्या : लय भारी दिसत्यात नाय दादा (लाजत) पक्या : अरे काळ्या ते न्हायी रे ..या पोरींनी देशाची पार अब्रू घालवली हाय बघ.कश्या वागत्यात काय फिरत्यात ! मन्या :भाऊ खरय बघा .. पक्या : लेका तिथ सैनिक जीव देतायत आणि या सेल्फी घेतात ! देशभक्ती च काय हाय का नाय ! मन्या : होय दादा,यांना सगळ्यांनी मिळून शिकवायलाच पाहिजे,मारू काय किक ? मन्या : पण तेनला सांगायचं काय ? पक्या : सांगायचं ! दोन द्यायच्या ठेऊन ...साधा चुडीदार घालून टिकली लाऊन आलीस तर ठीक (ढुंगणावर घसरलेली गुध्यावर फाडलेली  जीन्स  वर घेत) मन्या : मग तर आपल्या दादा गैंग च्या कोण वाऱ्याला पण याच नाय पक्या : येत्या १५ ऑगस्ट ला गैंग ची पोर घेऊन बायिक राली काढू तिरंगा घेऊन,या सगळ्या स्कुटी व...

एक झाड करपून गेल

Image
एक झाड करपून गेल एक झाड करपून गेल आजही नळाला पाणी आल न कोण रडल ना सुतक आल योजनेमध्ये लावल होत याच होत ना त्याच होत पाऊस औंदा झाला चांगला तवाच शेवटच न्हान झाल जनावर पण चाखत नव्हत वाडास कोणी देखत नव्हत सिझन गेला फोटोचा अन ऊन पानास जाळून गेल कुणी मुतल म्हणाव तरी सावली एवढ झाल नव्हत मालक वासा डोळ्यात राखाय सरकारी जागेत रंगून मेल   दिवाळी झाली शिमगा झाला वाळल्या काडीचा हुरडा केला बघता बघता मोसम गेला वैशाख वणव्यात पुन्हा एकदा वृक्षारोपणाची जागा झालं एक झाड करपून गेल आजही नळाला पाणी आल ......                            -अजय निंबाळकर