Posts

कानुन नेक है

कानुन नेक है रपट लिखायी हमने भी गरीब के मरणे की.. मुकदमा चला  तारीख लगी काले कौवे नाचने लगे कॅमेरा लेकर गिध्धं चोतर्फा गुर्राने लगे अखबार पहले से शुरु होकर छिपाते छिपाते बिचमे खबर दफनाते रहे दिन गुजरे महीनो की गीनती सालोंमे बिती चार बार ईसका कफन हटाया कौवोने तो उसे जिंदा बताया और एक तारीख जडाकर कौवो के शहनशाहने भि ध्यान दिया!! ढेर के निचे गढा मुर्दा खुदही मौत से  शर्मसार बेचारा सुना था उसने भि देर से ही सही वहां इंसाफ होता है...!! एक अंधी औरत का पुतला बंद आखोसे सुन रहा था शायद.. दलीलोंको ध्यानसे.. कोई कुचल गया है गरीब को  नशे मे चुर बडेही ईत्मीनानसे.. फीरसे कौवा बौला.. साहाब उसने दवाभी दिलाई.. मर गया था गरीब ईसमे  उसकी क्या बुराई.. जरा बाहर जाकर देखो ईसकी कीतनी ठाठ है.. मरे गरीब का नाम ना पुछो वो तो जनम से ही सपाट है.. अनाज भि मिल पाता भुका नंगा मर जाता किसे शायद पता चलता?? वो तो नसिब अच्छा  सहाब ने ही कुचल दिया रस्ते नरकमे सो रहा था बेचारा  साहबने मारकर स्वर्गमें पोहचा दिया.. अदालत ने पंद्रहं साल के...

इतिहासातला एकसंध भारत

इतिहासातला एक सं ध भारत कुणी हिंदुत कुणी मुस्लिमांत विष पेरतो कुणी उच्च नीच म्हणून  उरला हिशेब पुरा करतो संविधान आणि न्यायपालिका दोन्ही असूनही भारत मात्र या सगळ्यात नुसताच गुदमरतो तीन चार हाजार वर्षाचा इतिहास उकरून तो आपली पोळी भाजून घेतो देवही न कळला न अल्लाह ज्याला तो गर्दीसमोर विषारी भाषेत स्वतःला संत मौलवी घोषित करतो देवळे अन मशिदी मात्र तशाच दाराबाहेरचा भिकारी आपली पुढची पिढीही नागडी करतो भारत मात्र या सगळ्यात नुसताच कुठेतरी गुदमरतो....! ते आपापसात जोर जोराने घोषणा करतात आमच्यातले तरुण पोट्टे तावातावाने शास्त्रे उचलतात न वाचताच विवेकानंद,बुद्ध,पैगंबर न कोणी ज्ञानी   डोक्यात नुसतीच आग घेऊन न जानताच आपलाच खून करतात ! मग मात्र यांचा हा अन त्यांचा तो नेता उठतो आमच्यावर अन्याय झालाय म्हणून केल त्याने अस स्वतः अलिशान गालिच्यावर बसून म्हणतो तरी सुद्धा आपल्या खुनाची कडवी निंदा करतो यांचा गड शाबूत राहत फक्त  बिचारा माणूस मरतो भारत मात्र या सगळ्यात नकळत कुठेतरी गुदमरतो....! सगळे तरी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवता...

एका वडाची परवड ....

Image
एका वडाची परवड ....             कधी कधी मातीची खूप आठवण येऊ लागलीना कि मग मी भारताचा नकाशा desktop ला लावतो आणि मनभरून google earth वरती झूम करत करत माझ्या आईच दर्शन घेतो.अगदी काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेला माझा  विशाल भारत डोळ्यात बसवताना त्याच्या महानतेची प्रचीती येते.केवढा आपला देश आपण किती नशीबवान आहोत कारण आपण इथ आहोत.बघा न जगातली सारी वातावारणे एका नकाशात पाहायला मिळतात.वाळवंटही आहे हिमशिखरे देखील  आहेत, खेडी आहेत शहरे हि आहेत,नद्य,तलाव जंगले अरण्ये...अन कित्ती काय.भारताची आठवण आली म्हणून काही हे बोलतोय अस नाही ना दिखाऊ देशभक्तीचे झंझावाती वारेही माझ्या डोक्यात शिरले आहे असेही नाही जे कि घोषणा देऊन व एखाद्याला धमकावून माझ मन अभिमानाने भरून येयील असं देखील अजिबात नाही.हल्ली बातम्यांमध्ये पाहून काळतच आहे भारत महान आहे तितकाच इथल्या काही लोकांचा मेंदू लहान आहे जे काही संकुचित विचारांना मोठ करून संपूर्ण भारतीयत्वाचे झेंडे मिरवताना दिसतात.जाऊदे मला त्या विषयात नाही पडायचं हा तर संपूर्ण भारतीयत्व म्हणजे काय ओ ?घ...

नमस्कार करते हं...!

नमस्कार करते हं...!                १ जानेवारी १८४८ साधारणपणे १७० वर्ष झाली असतील फुल्यांनी स्त्रीशिक्षण आणि समतेची कवाडे खुली केली आणि संस्कृतीच्या नावाखाली जखडलेल्या साखळ्या सैल करत माझी आई ,आजी ,बहिण...लिहिती बोलती झाली.आजवर भारतातल्या  प्रत्येक उच्च पदावर विराजमान होऊन तीनही तीच सामर्थ्य सिद्ध केलय.संसदेत भल्या भल्यांची पुंगी थंड करणाऱ्या  इंदिरा गांधी , सुषमा स्वराज असोत कि अंतराळात सर्वाधिक स्पेस वॉक करणारी सुनिताव कल्पना चावला असो सावित्रीच्या लेकी आज कुठेच मागे नाहीत.जगभरात तर आहेच पण भारतात आज कोणत्याही परीक्षेत मुलींचं उत्तीर्ण होण्याच प्रमाण जास्त आहे पण मी हे अचानक का बोलतोय!          परवाच माझ्या एका मैत्रिणीचा फोन झाला तीच MBA finance झालय,चांगल्या खाजगी कंपनीमध्ये नोकरी करत आहे हाताखाली २-३ ट्रेनी पण आहेत.वय लग्नाच झालय म्हणून मीच गंमत करत तिला म्हणायला गेलो “काय काय,कांदेपोहे झाले कि नाही?” वाक्य संपल न संपल तोच एक मोठा पॉस घेतला तिने अन माझ्याही ...

सूरत बदलनी चाहिए…

सूरत बदलनी चाहिए … भारतीय संविधानाच्या चौथ्या खांबाला सादर प्रणाम ...                                     मी लहान होतो तेंव्हा रोज ७ वाजता टीव्ही वर सात रंगाचे पट्टे यायचे आणि मग घड्याळ अन बरोबर ७ वाजले कि ठरलेल्या त्या संगीत लहरींच्या नंतर सुरु व्हायच्या बातम्या ...          “नमस्कार मी ....... बघुयात आजच्या ठळक घडामोडी ...अशा अतिशय नम्र स्वरात देशातील संवेदनशील अतिसंवेदनशील व तितक्याच बाकीच्या बातम्या हळुवार घरात घुमायच्या . त्यावेळी तर नेते पण किती जबरदस्त होते बाळासाहेब,अटलजी,प्रमोद महाजन,विलासराव ....अजून बरेच.लादेन,सद्दाम दाऊद,छोटा राजन, यासारखे किती भयानक लोकांच्याही बातम्या येत असत.खून तेव्हाही व्हायचेच...दंगली पण झाल्या पण देश खऱ्या अर्थाने सावरला तो लोकशाहीच्या या चौथ्या खांबामुळे......             ...

थापाड्यांच्या दरबाराचे थापाडेसे बोल

थापाड्यांच्या दरबाराचे थापाडेसे बोल थापाड्याच्या दरबाराचे थापाडेसे बोल निवडणुकीचे सोंग उतरता यांचा दिसतो डौल म्हणे , शेतकऱ्यांच राज्य आमचं शेतकऱ्यांच्या साठी ज्याच खाऊन मोठे झाले खंजीर त्यांच्याच पाठी ! उथळ माथ्याने आरोप करतात त्यांनी अस केल बड्या धेंडांच कर्ज इथच कुणी हो माफ केल ?? मतदान संपल खुर्ची रुतली आता न आमचे मोल थापाड्याच्या दरबाराचे थापाडेसे बोल digital केलात म्हणे भारत, mobile ने होते का शेती? नोटा केल्यात बंद तेंव्हा भाज्याची वाटली का भीती ? अक्कल दाखवत मागता खुशाल आमच्या जगण्याची खात्री तुम्हाला काय कळणार पिक खातात गारांच्या रात्री ! कर्ज देतो मरण आवर अरे तुला कळतो का इथला भूगोल थापाड्याच्या दरबाराचे थापाडेसे बोल कर्ज तरी आमचं कुठलं तेही वशिल्यान मिळत आम्ही जातो मागाय तवा कागदात आम्हाला गुंडळत लेक वयात येते तसं काळीज भरून येत वांझोटस रान बघून गुमान फाशी घेत पिक आले कि दर पाडतोस,स्वस्त केला शहरात सांगतोस मढ्यावरती आमच्या नुसते अनुदानाचे उरती गोल थापाड्याच्या दरबाराचे थापाडेसे बोल ७० वर्षाच सांगू नकोस तू तरी क...

लय गरम होतंय राव

Image
image of rotary club green forest project 2011-12....as it is in 2017 ...place shivaji university ...front of distance education center. लय गरम होतंय राव यंदा गरमी परत वाढनार परत झाडांची आठवण येणार घोषणा होणार,अभियान चालणार जुनेच खड्डे नवे होणार पंचायती ला लाखो म्हणे सरकार आपले रोपे देणार काही कागदावर तर काही सेल्फी साठी जुन्याच जागी  हिरवी होणार कलेक्टर,मंत्री कुदळ घेणार काळ्या मातीचे गोडवे गाणार whatsapp facebook नव्याने भरणार झाडे लावाचा मेसेज घुमणार उष्मा वाढणार म्हातारी मारणार चेनल वाले आढावे घेणार आत्महत्या होणार मोर्चे निघणार परत परत हे सारे होणार पण झाड मात्र नाही जागवणार !! झाडे लावायला पाहिजेत लय गरम होतंय राव..हो न !!                         -अजय निंबाळकर