शब्द
शब्द शब्द बोचरा बोचरा घाव जिव्हारी कठीण शब्द परतवे मुढ शब्द साठवी सज्जन शब्द उनाडसा वारा शब्द जागता पहारा शब्द साठवुन मनी शब्द बनतसे घण शब्द विषारी दुधारी शब्द थोरला बारका वेळ येता शब्द बने ज्ञानियांचे हो वचण शब्द मनमोकळासा शब्द बेरकी जनाचा किती प्रकार तयाचे शब्द एक कुंजवण शब्द शब्द हा जपावा ज्याचा त्याला परतावा शब्द आपला दिसत काळ देतो आठवून मीही घेतली शपथ आता ठेवेन हिशेब पुरे झाली बडबड आता झोडपेन मन शब्द थांबता स्थिरसा भेटे आभाळाचे बळ रोज फुकाचा बोभाटा नसे वाटत नवीन शब्द शब्द मी वाचेन शब्द शब्द मी वेचेन गेला पुरा पावसाळा याच जीभी साठवेन शब्द ओठात मनात साठवेन हो ज्ञानात ऐसा लिहेन साजिरा जग भूलेल गाण्यात शब्द पूजेन मी नित्य शब्द भजेनही नित्य आता बोलणेच नाही शब्द खरा ठरवेन ...