Posts

भारतका अमृतमंथन

  भारत का   अमृतमंथन लाखों   ने   हमको   लूटा   था अंग्रेज़ों   ने   भी   बाँटा   था सोने   की   चिड़िया   थे   हम   भी   सब   चला   गया   बस   घाटा   था हर   नर   नर   में   डर   बैठा   था   हर   घर   घर   घूँघट   रोता   था   ग़ुलामी   रग में  भी   उतरी   थी स्वाभिमान   का   सिक्का     खोटा   था   फिर   ५७   का   समर   हुआ   चमकी   झांसी   रण   अमर  हुआ कम   एकसंघता   के   कारण गोरा   फिरभी   वह   प्रबल   हुवा   फिरसे   काला   साया   छाया जुलमी   गोरा   शासक   आया   ललकारी   टिलक   की   गुंजी   जब   वह   तख्त   फिरंगी   घबराया   जब   नमक   उठाया   बापू   ने गोरोंको  पसीना  छुटा ...

श्वास

श्वास मागतात लोक जिथं तो खास बैठकीत व्यस्त आहे  बुलेट ट्रेन , हजारो कोटींची विमानं , भले मोठे, पुतळे मंदिरे , पक्ष कार्यालये , आलिशान संसद ज्याची स्वप्ने आज तिथेच गरीबांची मौत स्वस्त आहे तो म्हणाला दौरे करु, आम्ही मान हालवली लाखोंची गर्दी त्याच्यामागुन चालवली  त्याला चिंता सत्तेची, पिपासु नितीमत्तेची  कुंभ झाले निवडणूका झाल्या तरी या सुंभास तमा नाही घर जळताना जपतोस पाहुणचार  प्रतिमेचा हावरा किती रे तू दुर्दैव, आमची तुझ्यावरच भिस्त आहे!! बोट दाखवायची वेळ नाही तरी पिलांना खिजवतोस  सोबत घेवुन चालायच्या वेळीच नेमका फसवतोस  किती तोतया तुझे अश्रु हाहाकारातही फिरतोस तू जिंक बाबा सगळी राज्ये तसेही काय करतोस तू!!  डॉक्टर थकलेत, पोलिसही थकलेत  तुला रे कसले कष्ट आहे!  लोक तरी कुठे जागे होतात !  त्यांची दुनिया ३ जिबी डाटा मधेच रमली आहे  तुझ्यावर टीका करावं तर लगेच तुझी भडवी फौज जमली आहे  पण आता संयमाचा बांध पुरता तुटतो आहे ज्याचा जिवलग जातो त्याचा तुझ्यावर आशुळ उठतो आहे  कितीरे पचवशील गरिबांचे शाप!  राजकारणाच्या उकिरड्यांवर तुझी ...

पुलवामा

 आज पुलवामा झालेलं.... बातम्या व बातमीदार घबाड सापडल्यासारखे दिसरात भुंकत होतं शहिद सैनिकांच्या घरात घुसून असंवेदनशीलपणे “तुम्हाला काय वाटतंय तुमचा मुलगा गेलाय?” असले भिक्कार प्रश्न विचारत होतं तर कुणी आता ईट का जवाब पथ्थर वगैरे , ५६ इंच जवाब , नया भारत असले विर ज्वर पसरुन  सरकारच्या चुका झाकत होतं आज पाहा फार फार तर तासभर यांना आठवण उरेल  कोणीही त्याच्या ना घराकडे फिरेल ना त्यांच्या पोरांसाठी एखादी बातमी करेल  हे फक्त मढ्याचे टाळु पुसतात व सत्तेचे गोड तळवे चाटतात  युद्धाचे नगारे स्टुडियोतुन वाजतात तिकडे सैनिक रक्तात भिजतात  कुणीच नसतं विचारत जाब सत्तेला ... हाड! तुमच्या माकडी नीतिमत्तेला कुटत राहा या दलालांचे टाळ  शाप देत राहील त्या प्रत्येक विधवेचं कपाळ युद्ध घेवुन थयाथया नाचता  शांततेच मुसळ केरात लोटता सतत नुसत पेरता राग बातमी देता की लावता रे आग  बातमीत देखिल संवेदना हवी टिआरपी म्हणजेच सारं नसतं चौथ्या स्तंभाच खंबिर असणं  लोकशाहीचा आधार असतं इथे तर सारेच विकलेले कुणी उजव्यांना कुणी डाव्यांना सलाम तुमच्या चाटुगीरीस  सलाम तुमच्या ...

मोरया

लंबोदर लंबोदर पितांबर फणिवरधर तुच तु वार्यावर तार्यांवर सार्यावर तुच  प्रथमावर अंतावर मंत्रावर तुच तु मोरया... मोरया... तु कविश तुच क्रिती मनोमयी तुच तु भक्तांचा वाली या जगताचा नाथ तु  तु प्रमोद तुच पुरुष रुद्रप्रिया तुच तु तुच सखा तुच दिव्य आणी भव्यहीच तु  विघ्नांना हरतो जो सुरवरही तुच तु मोरया  मोरया ... सदनातुन वदनातुन भुवनपती तुच तु ज्ञानाचा तु स्वामी भक्तीचा सुर तु  वेदातुन गितेतुन श्लोकांचा सार तु शास्त्रांतुन शस्त्रांतुन भिमरुपहीच तु  हेरंभा तु प्रचंड आनंदही तुच तु मोरया....मोरया  मोरया ..मोरया  मनमाळु मायाळु मोदकपरी गोड तु गजवक्रा तु गोंडस बाप्पा आमचाच तु  श्वेतांबर शांभव अन् सिद्धीप्रिया तुच तु  हे स्वरुप तु तरुण कारुण्यही तुच तु  वक्रतुंड महाकाय सर्वकोटी तुच तु  मोरया... मोरया  पुजतो तुज भजतो तुज शब्दांवर स्वार तु तु कलेत तु स्वरात ह्रदयातही तुच तु  चतुर्भुजा अवनिशा जगस्वामी तुच तु प्रथमपुज्य देवरता दुर्जाही तुच तु  मृत्युंजय ओंकारा चित्तेश्वर तुच तु मोरया... मोरया -अजय निंबाळकर

ग्रेस

ग्रेस   दहा दिशा जगातला   मी शोधून घेऊ कुठली   मी जिथे धावतो तिकडे   बघ तुझी सावली फुटली   मी संध्याकाळी म्हणली   ती गीते तुजला स्मरूनी   अश्रूत काळ ओघळता   दुखांची नाळ समजली   मी पाणे वाचून पाहतो   मी राने वाचून पाहतो   ह्या छटा निळ्या गगनाच्या   हातांनी स्पर्शून घेतो   मग धमन्या मधुनी वाहते   आयुष्य बोलके होते   तेंव्हा मग हातून अलगद   शब्दांची माळ सरकते   - अजय निंबाळकर