Shabd saath
किती असावे क्रूर एकटेपणाचे भुत
डोळ्यासमोरुन झोप लाटतं
कसलीच ना देतं सुट!
श्वासाचे आवाज गारुड करतात
मिटता डोळे आठवणी दाटतात
लाख लाख गर्दिसमोर आपणच होतो
आनाहुत!
कैद बरी असेल कैदी गप्पा तरी मारतात
इथे फक्त आरसे समोर
एकटेच एकट्याला घेरतात
काच फोडुन टाकली तर प्रत्येक
तुकड्यात नवीन तुट
आता
उधारीने नवे चेहरे
ओळखीचे केले
नशीबात आमच्या यार कुठले!
सारेच स्वार्थी साले
हाक मारली स्व:तच मला
कागद समोर आला
शाहीसोबत बघता बघता
परत बोलका झाला
झाला पुण्हा शब्द सोबत
मग
स्वैर भाव जोडायची लयलुट
किती असावे क्रूर एकटेपणाचे भुत
डोळ्यासमोरुन झोप लाटतं
कसलीच ना देतं सुट!
Ajay Nimbalkar
डोळ्यासमोरुन झोप लाटतं
कसलीच ना देतं सुट!
श्वासाचे आवाज गारुड करतात
मिटता डोळे आठवणी दाटतात
लाख लाख गर्दिसमोर आपणच होतो
आनाहुत!
कैद बरी असेल कैदी गप्पा तरी मारतात
इथे फक्त आरसे समोर
एकटेच एकट्याला घेरतात
काच फोडुन टाकली तर प्रत्येक
तुकड्यात नवीन तुट
आता
उधारीने नवे चेहरे
ओळखीचे केले
नशीबात आमच्या यार कुठले!
सारेच स्वार्थी साले
हाक मारली स्व:तच मला
कागद समोर आला
शाहीसोबत बघता बघता
परत बोलका झाला
झाला पुण्हा शब्द सोबत
मग
स्वैर भाव जोडायची लयलुट
किती असावे क्रूर एकटेपणाचे भुत
डोळ्यासमोरुन झोप लाटतं
कसलीच ना देतं सुट!
Ajay Nimbalkar
Miss you too much bro...
ReplyDeleteme too bhawa
Delete