"बालपण"..... "सायकल" आणि "दगड"



"बालपण".....   "सायकल"  आणि  "दगड"
मी एक मध्यमवर्गीयही नाही, ना गरीब. माझे बाबा सरकारी ३ श्रेणी सेवक आहेत. माझं बालपण हे घरी राहायला जागा नसल्याने व गावात शिक्षणाची सोय (होती) पण काय माहित ती देखील नसल्याने, वयाच्या ८ व्या वर्षा पासूनच माझ्या मामाच्यात गेलं. माझ्या आई बाबांपासून लांब .पण आजोबा निवृत्त सैनिक होते म्हणून तसे लय लाड व्हायचे,पण आई बाबांची जागा कोण घेऊच नाही शकत ना.
मला आठवतंय तेव्हा टेलेफोन कमी होते. बाबा गल्लीतल्या पाटलांच्या घरात महिन्यातून २-३ वेळा फोन करायचे आणि महिन्यातून एक वेळा ते मला भेटायला यायचे. बाबा येणार म्हणून मी दुपार पासूनच गल्लीच्या कोपऱ्यावरच्या एका मोठ्या दगडावर बसून त्यांची  वाट पहात असायचो. मामाच्या गावात माझे तसे फार मित्र नव्हते, म्हणून मी  लहानपणी  मला स्वतः चित्रपटात असल्याचं भासवायचो  व मी खोटा विलन नजरेत आणून कथानक रंगवत स्वतःशीच द्विपक्षीय संवाद आणून वेळ काढायचो. सहावीला आलो आणि अचानक बाबानी माझी बदली  माझ्या मूळ गावी केली. तिथं गेल्यावर कळालं कि मी सरकार आहे म्हणून.... सगळे जण मला एवढा लहान असून पण आहो-जाओ बोलवायचे. माझे आबा गावचे माजी सरपंच आणी जेष्ठ नागरिक म्हणून तिथे त्यांना खूप मान होता.
बेकार फक्त एवढंच  होतं की  माझी शाळा  घरापासून २ मैल लांब चढावर होती. म्हणून मी माझ्या मित्रांसोबत त्याच्या सायकल वर डबल सीट जायचो. सहावी ते दहावी मी प्रत्येक वर्षात सांगेल ती टक्केवारी काढायचो अन बाबा सायकलचे आश्वासन द्यायचे. नंतर मलाही हे कळून चुकलं होत कि चौदा माणसे असलेल घर साभाळनाऱ्या या सरकारी नोकरदारास माझी सायकल फक्त अश्वसानातच देन शक्य होणार होत.
 कळलंच नाही कधी वर्ष सरली, मी बी.एस्सी. झालो अन सहा वर्षाच्या गॅप ने मामाकडे गेलो. पहिला त्या दगडावर बसलो पोटात गोळा आला. काय झालं कुणास ठावूक पण मन रस्ता बघत कोणाचीतर वाट पाहू लागलं होत.इवल्याश्या त्या क्षणात मी माझं एकटेपण पुन्हा उजळून घेतल  आणि मी गावी आलो .नंतर शिक्षण पूर्ण केलं. आता पी.एच.डी साठी परदेशी आलो. पहिल्याच सुट्टीत जेव्हा गावी गेलो तेंव्हा समोरच्या अण्णा ला नवी सायकल आणली होती. परदेशात झेंडा लावणाऱ्या माझ्याकडून आन्नाच्या बाबानी सायकल पुजायला लावली.आईशप्पत डोळ्यात पाणी आलं अन मी माझ्या बाबांकडे पाहिलं... याच वर्षी आम्ही वॅगन आर चारचाकी गाडी घेतली होती तिला पाठ लाऊन बाबा उभे होते. मला मात्र सायकल पूजताना माझ्या शाळेतले दिवस आठवत होते. मित्राच्या सायकलीच केलेलं कवतुक आणि रोज इच्छा नसून केरेज वरती बसून बुडाला सळ्या  रुतावत मी शाळा गाठायचो .आज घरी दुचाकी आली , कार आली तरी  आण्णाची  नवी कोरी सायकल माझा ठेका चुकवून गेली. सुट्टी संपता-संपता शेवटची दोन दिवस पुन्हा मामाच्या गावी गेलो गल्लीत रस्ता रुंदीकरण झालं होत.मी या कोपऱ्यातुन त्या कोपऱ्यात पाहिलं. माझा दगड तिथं न्हवता. कुणाला विचारू शकत न्हवतो, ना सांगू शकत होतो पण कोणीतरी आपलं गेल्याचा भास झाला. 
म्हणतात न
"माणसाच्या आयुष्यात, माणसाचा जीव कधी कसा कुणावर वा कशावर जडेल सांगता नाही येत.... म्हणून मला वाटत... "जगात कुणीच एकटं नसत... ज्याचं त्याच आकाश असत"

- अजय निंबाळकर 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

"संप करायाचे संस्कार"

आम्ही कशाला!!!

Shabd saath