पृथ्वीमोलाचा माणूस : प्रा. पी. एन. भोसले


           “पृथ्वीमोलाचा माणूस : प्रा. पी. एन. भोसले”



“काही माणसं जगात तुमच्यासाठी यशाचा अमृतकलश घेवुन येतात
तुमचं काम इतकंच उरतं की तो कलश स्विकारुन अमृतप्राशन करत आयुष्य यशस्वी करायचं
पण या अमृतकलशासाठी त्यांना मात्र मंथनाला सामोरं जावं लागतं
हे न ते कधी सांगतात ना भासवतात फक्त मुक्तकरांनी देत राहतात”
           आयुष्याची वाट अक्षरश: भरकटनार वाटत होतं मला , जेंव्हा मि बिएस्सी पास झालो होतो.कोण म्हणत होतं औषध विक्रेता हो कोण साखर कारखाना कामगार हो ,वैतागलो होतो राव. एमएस्सीची लिस्ट मध्ये नाव तर अशा जागी जिथॅ बरोबर सगळे प्रवेश संपतात. ते पाहुन तर पुरता हताश होऊन गेले होतो. समोर फक्त अपमान आणि अंधकार दिसत होता. पुणे विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा न दिले करणे तिकडे प्रवेश होत देखील अशक्य होते. रोज सकाळी उठायचं बाबा कामावर जाताच कोल्हापूरला सुटायचं दिवस घालवत थेट झोपी जायच्या वेळी येऊन मन खाली घालून पडायचं असा लाजीरवाणा दिनक्रम चालू होता. दिवा विझनीला येत कसा तडफडतो तसं माझं मन हेलावत होते. नशीबच माझे म्हणून मला अरविंद बागने  हा माझ्याच महाविध्यालयातला सिनिअर भेटला आणि त्याने मला प्राध्यापक पी. एन. भोसलेंची भेट घ्यायला सांगितली.प्रवेश फेरी संपत आली होती आणि मला प्रवेश नाहीच मिळणार हे जवळपास निश्चित वाटत होते. तरीही एक शेवटचा पर्याय म्हणून मी सरांना भेटायला गेलो. आजही मला तो क्षण जसाच्या तसा आठवतोय, “सर मी आत येऊ” ...अस म्हणत मी थेट आत केबिन मध्ये गेलो. सर थोडे अचंबित होते त्यांच्या केबिनला तशी माणसांची सारखी रीघ लागलेली असायची त्यात मी प्रवेशासाठी आलोय हे त्यांनी फक्त चेहरा पाहून ओळखले होते. पण इतर लोकांप्रमाणे त्यांनी मला उभ्याउभ्या जायला नाही सांगितले. ये बस म्हणाले, तोवर एक फोन आला. मी त्यांची केबिन निहाळत होतो तशी लहान असलेली केबिन सरांनी अतिशय नीटनेटकी सजवली होती, सुंदर अत्तराचा सुवास दरवळत होता. “हा बोल..जर प्रवेशासाठी आला असलास तर खरच सांगतो अजिबात जागा शिल्लक नाहीत बघ” मग आता  मी काय बोलणार तरीही मी त्यांना विनवणी केली माझे पपेर रीचेक करायला दिलेत मार्क्स वाढून येतील सर हे सागितले. आता सर विद्यापीठ वेळत पेपर रीचेक नाही करत यामुळे मी संपूर्ण वर्ष अभ्यासाला मुकेन अस कळकळीने सांगितले. सर म्हणले “मी बघतो आणि सांगतो तुला तू संतोष कांबळे सर न भेटत जा”

              पंधरा दिवस उलटले पंढरीच्या पुंडलीकासारखा मी पायरीशी रेंगाळत होतो, एक दिवस माझा पांडुरंग प्रसन्न झाला. त्यांचा निरोप आला कि येऊन भेट. “हे बघ अजय, एका विध्यार्थ्याने पुणेला प्रवेश घेतल्याने एक जागा रिक्त झाले ती देखील विना अनुदानित अप्लाईड केमिस्त्रीची तुला प्रवेश देईन मी..परंतु आता ऑगस्ट सुरु झालाय सारे अभ्यासक्रम अर्ध्यावर आलेत तुला खूप कठीण जायील. मी आनंदाने भारावलो होतो म्हणालो “सर मी खूप अभ्यास कारेणे, तोवर माझे रीचेक चे मार्क्स पण आले होते ते दाखवत मी म्हणालो सर २३ गुण वाढलेत एक पुरवणीच गायब होती. आता हे गुण मी नाही जोडणार थेट एमएस सी मध्ये चांगले आणून दाखवेन”. घरी आलो बाबांनी ताबडतोब फी भरली मनातून एक सल होते कि आयुष्यात पहिल्यांदा फी भरतोय पण ते भरून काढेन हि देखील शपथ घेतली. उशिरा झाल्या प्रवेशाने मी माझे मित्र सुभाष मगदूम व  तुकाराम डोंगळे  यांच्या खोलीत प्यारासाईट म्हणून राहिलो. भोसले सर वगळता सर्व शिक्षक, सिनिअर, मुली म्हणत होत्या कि हा एक वर्षाचा पाहुणा. एक तर म्हणाले असले प्रवेश घेतातच कशाला. त्यालाही बरीच करणे सल्ग्नित होती. “ एखाद्या मनुष्याने गुलाबांच्या गर्दीत बत्तीस मोगऱ्याचे एक रोपटे लावावे आणि सारी दुनिया गुलाबाचा सुगंध विसरून जावी अशी किमया पी. एन. भोसले सरांनी अप्लाईड सुरु करून केली होती”. या विभागात रसायन शास्त्रात लागणाऱ्या तिन्ही मूळ विभांगांचा अभ्यासक्रम होता, सुरु करत असताना बरेच जणांनी नाके मुरडली होती,कोणाचे कारण कार्यभार असेल कोणाचे फक्त नकाराला नकार पण, बघता बघता ५ वर्ष यशस्वी हा विभाग चालू झाला, सरांनी अक्षरशः जीवाचे रान करून निधी आणला. एवढेच नाही तर १००% प्लेसमेंट करून औध्योगीक, शैक्षणिक दोन्ही क्षेत्रात अप्लाइड च्या मुलांचा राजरोस प्रवेश यशस्वी झाला. त्याच बत्तीस मोगऱ्याचे मी एक फुल झालो होतो.
                  अभ्यास आणि रोजचे प्रक्टिकल याचा भार मला सोसवेना, कारण बाकी विध्यार्थी सुरवातीपासून शिकत होते मी आडवाटेचा. सरना याची पक्की जाणीव होती, एक दिवस त्यांनी मला बोलावून घेत सांगितल, “अजय, लेखी परीक्षा संपता मी तुझे प्रक्टिकल घेऊन तुला प्रक्टिकल परीक्षेची तयारी करवून घेतो तू निदान 3 विषय सोडव नाहीतर सगळे मला बोल लावतील”. सरांनी माझ्या पंखाना अजून बळ देऊ केले आणि मी २० दिवस प्रकाश पहिला नाही. तुका, सुभा दोघांनी लहान भावासारखे मला सभाळले, सरांची पाठीवर  थाप एक जादूच होती. परीक्षा आली तरी मुले माझे विनोद करायची, “अरे एक तर सोडव”असे मला एक प्राध्यापक म्हणाले होते. आज त्यांच्या नजरेत माझी छबी वेगळी आहे. सरांचा अपमान होऊ द्यायचा नाही आणि बाबांनी घातल्या पैश्याचे चीज करायचे हेच मला स्फूर्ती देत होते. परिक्षा झाली दिवाळी झाली खरतर दिवाळीत मी आतून घाबरलेला होतो. आणि निकालाचा दिवस उजाडला, दिवसभर स्वच्छतागृहाची वारी सुरु होती.  संध्याकाळी आम्ही मोबाईल वरून आमचा निकाल पहिला. ६४ मुलांत फक्त १८ जन सर्व विषयात उत्तीर्ण होते. आकडे बघूनच घाम फुटला. १८ जनात क्रमांक न बघता मी उरलेल्या ४६ क्रमांकांना चाळून काढले, त्यात माझ्या दोस्ताचा वैभव चा नंबर होता, बिचारा नाराज झाला. शेवटी मग १६ क्रमांकात माझा आणि रवी पाटील यांचा क्रमांक होता, आईशप्पथ !!! “मी आनंदाने रडत होतो, ओरडत होतो. हजार अपमानांनंतर भेटलेल यश हे खूप आनंददायक असते, आणी याचा मी साक्षीदार होतो. कसलाच विलंब न करता मी सरांची केबिन गाठली आणि नमस्कार केला. त्यांच्या डोळ्याच्या लखाकीत मी माझं यश पाहत होतो. सरांची निवड मी सार्थ करत पहिल्या दहात आलो होतो. आजही तो क्षण आठवला तरी डोळे पाणावतात.
              पुढे विभागाच्या प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेत आणि अभ्यास कारत मी सर्वांची मने जिंकली, विभाग कोणता आहे यावरून विध्यार्थी ठरत नाही न गुणांवरून, ते ठरत ते त्याच्या जीद्दीवरून आणि गुरूंच्या प्रोत्साहनावरून . नशिबाने मी दोन्ही बाबतीत आपले नाणे खणखणीत वाजवत होतो, पुढे मला गोवाला जॉब लागला तो एक दिवसात सोडून मी क्लासेस कडे वळलो पण सरना नेहमी भेटत राहिलो. सरांच्या मनात नेहमी आमच्या दहा वर्ष पुढचा विचार चालायचा, एवढच नाही तर कोणत्याही विभागाच्या विध्यार्थ्याला दुजाभाव न करत ते सर्वासाठी मनपासून प्रयत्न करत कंपनी सोबत संधान साधत प्लेसमेंट खेचून आणायचे. माझ्या बाबतीत तेच झाले गुरुपौर्णिमेला त्यांना भेटायला गेलो आणि घनवट सरांनी मला कोरियात माळी सरांच्या प्रयोगशाळेत पी एच डी प्रवेशाबद्दल सांगितले. मी भोसले सरांना भेटायला गेलो बसतो न बसतो तोच सरांनी स्वतःच म्हणाले “क्लासेस च्या भरोश्यावर नको राहू पी एच डी कर, कोरियात प्रवेश होऊ शकतोआहे का तयारी ?” कस सांगणार कि मी हेच विचारणार होतो. महादेवाच्या मंदिरात नमस्कार करताना हाती बेलपत्र पडावे आणि आयुष्य सार्थकी लागावे अगदी असा क्षण तो. मी क्षणाचाही विलंब न करता हो म्हणालो आणि त्याच वर्षी कोरियाला आलो. इथं जरी आलो असलो तरी मनोमन सरांच्या केबिन मध्ये जाऊन येतच असतो मी. मी तसा देव मनात नाही, सहसा मंदिरांच्या पायऱ्याही झिजवत नाही पण देवमाणसे मात्र माझ्या नशिबात आली असतील तर ती गुरुवर्यांच्या रूपांनी. आज या पृथ्वीमोलाच्या माणसाचा म्हणजेच माझे गुरु पी. एन. भोसलेंचा वाढदिवस, मी निर्मिकला हीच प्रार्थना करेन कि त्यांना उदंड आयुष्य लाभो, आरोग्य लाभो आणि त्यांची छाया सदैव आमच्यावर अशीच राहो.

“मी न होतो कुणी, आज दिसतो जनी
मुर्तीलेहो मला हाय या सज्जनी
जन्म झाला जरी ज्ञान नव्हते मनी
घडविले हो मला या गुरुजनी

रोज नमतोय मी गीत लिहितोय मी
शब्द वाहतोय हे त्या गुरु चरणी
शब्द वाहतोय हे त्या गुरु चरणी     
....


                                                                  -अजय निंबाळकर     

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

"संप करायाचे संस्कार"

आम्ही कशाला!!!

Shabd saath