मराठी


असतिल भाषा हजार तुमच्या
आमुची आहे माय मराठी
अमृतसुद्धा फिके पडते
जेंव्हा कोणी गाय मराठी

किती लिहावी किती पहावी
अक्षरमोती हाय मराठी 
लिहता कविता अशी सरकते
जशी मलमली साय मराठी

गाते कोकिळ वाटे मजला
तिच्या मुखातुन व्हाय मराठी
कुसुमा विंदा नेमाडेंची
त्रिकाल लेणीच काय मराठी!

ज्ञान पेरती कणाकणांतुन
तरीही किती महाकाय मराठी
ग्रंथ काव्य महाकाव्य पेलते
तरिही सोपी जाय मराठी

उर गर्व हा भरुनी बोले
विश्व व्यापु जिंकाय मराठी
गडदुर्गांच्या छायेमध्ये
वाघिन शिवबांची हाय मराठी


-अजय निंबाळकर

Comments

Popular posts from this blog

"संप करायाचे संस्कार"

आम्ही कशाला!!!

Shabd saath