Posts

पुलवामा

 आज पुलवामा झालेलं.... बातम्या व बातमीदार घबाड सापडल्यासारखे दिसरात भुंकत होतं शहिद सैनिकांच्या घरात घुसून असंवेदनशीलपणे “तुम्हाला काय वाटतंय तुमचा मुलगा गेलाय?” असले भिक्कार प्रश्न विचारत होतं तर कुणी आता ईट का जवाब पथ्थर वगैरे , ५६ इंच जवाब , नया भारत असले विर ज्वर पसरुन  सरकारच्या चुका झाकत होतं आज पाहा फार फार तर तासभर यांना आठवण उरेल  कोणीही त्याच्या ना घराकडे फिरेल ना त्यांच्या पोरांसाठी एखादी बातमी करेल  हे फक्त मढ्याचे टाळु पुसतात व सत्तेचे गोड तळवे चाटतात  युद्धाचे नगारे स्टुडियोतुन वाजतात तिकडे सैनिक रक्तात भिजतात  कुणीच नसतं विचारत जाब सत्तेला ... हाड! तुमच्या माकडी नीतिमत्तेला कुटत राहा या दलालांचे टाळ  शाप देत राहील त्या प्रत्येक विधवेचं कपाळ युद्ध घेवुन थयाथया नाचता  शांततेच मुसळ केरात लोटता सतत नुसत पेरता राग बातमी देता की लावता रे आग  बातमीत देखिल संवेदना हवी टिआरपी म्हणजेच सारं नसतं चौथ्या स्तंभाच खंबिर असणं  लोकशाहीचा आधार असतं इथे तर सारेच विकलेले कुणी उजव्यांना कुणी डाव्यांना सलाम तुमच्या चाटुगीरीस  सलाम तुमच्या ...

मोरया

लंबोदर लंबोदर पितांबर फणिवरधर तुच तु वार्यावर तार्यांवर सार्यावर तुच  प्रथमावर अंतावर मंत्रावर तुच तु मोरया... मोरया... तु कविश तुच क्रिती मनोमयी तुच तु भक्तांचा वाली या जगताचा नाथ तु  तु प्रमोद तुच पुरुष रुद्रप्रिया तुच तु तुच सखा तुच दिव्य आणी भव्यहीच तु  विघ्नांना हरतो जो सुरवरही तुच तु मोरया  मोरया ... सदनातुन वदनातुन भुवनपती तुच तु ज्ञानाचा तु स्वामी भक्तीचा सुर तु  वेदातुन गितेतुन श्लोकांचा सार तु शास्त्रांतुन शस्त्रांतुन भिमरुपहीच तु  हेरंभा तु प्रचंड आनंदही तुच तु मोरया....मोरया  मोरया ..मोरया  मनमाळु मायाळु मोदकपरी गोड तु गजवक्रा तु गोंडस बाप्पा आमचाच तु  श्वेतांबर शांभव अन् सिद्धीप्रिया तुच तु  हे स्वरुप तु तरुण कारुण्यही तुच तु  वक्रतुंड महाकाय सर्वकोटी तुच तु  मोरया... मोरया  पुजतो तुज भजतो तुज शब्दांवर स्वार तु तु कलेत तु स्वरात ह्रदयातही तुच तु  चतुर्भुजा अवनिशा जगस्वामी तुच तु प्रथमपुज्य देवरता दुर्जाही तुच तु  मृत्युंजय ओंकारा चित्तेश्वर तुच तु मोरया... मोरया -अजय निंबाळकर

ग्रेस

ग्रेस   दहा दिशा जगातला   मी शोधून घेऊ कुठली   मी जिथे धावतो तिकडे   बघ तुझी सावली फुटली   मी संध्याकाळी म्हणली   ती गीते तुजला स्मरूनी   अश्रूत काळ ओघळता   दुखांची नाळ समजली   मी पाणे वाचून पाहतो   मी राने वाचून पाहतो   ह्या छटा निळ्या गगनाच्या   हातांनी स्पर्शून घेतो   मग धमन्या मधुनी वाहते   आयुष्य बोलके होते   तेंव्हा मग हातून अलगद   शब्दांची माळ सरकते   - अजय निंबाळकर  

आम्ही कशाला!!!

आम्ही कशाला!!! आमचे रस्ते .. तुमचे खड्डे आमची कर्ज... तुमच्या ठेवी आमची पोरंटारं... तुमचे भावी तुम्हाला मत देतीलचं.. बळीच्या आत्महत्यांची मढी ..तुमची कोट्याधिश भावी पिढी तुमच्या घर गाडी दौलती कारखाण्यांचे चाकर- पगारच्या हाडास चावणारा सरकारी नोकर प्रचारात फेकलेली भविष्यातली भाकर बघुन एका चपटीच्या घोटासकट तुमच्या दादा, भाऊ, पुतण्या , दिदी ताईच्या मागं नाचायला येतीलचं.. आम्ही कशाला!!! आमचे सरकारी दवाखाने...तुमचे ऐसपैस दिवानखाने गर्दीत गुदमरत्या लोकलची तावदाने..तुमच्या लाखोंच्या कर्जातही मिरवणारे कारखाने तुम्हाला मत देतीलंच.. मुक्या मध्यमवर्गाने भरलेले कर..भाऊंचे लखलखते घर कामगारांनी पुकारलेले संप...बागुलबुवांचे पक्षांतरांचे भुकंप चाराछावणीत पुढील वर्षी नवीन बगळे भेट देतीलचं आम्ही कशाला!!! आमची करपलेली रानं.. तुमच्या गळ्यातलं सोनं आमचा दरबुडवा कांदा...तुमचा राजकारणाबाहेचा सतेज धंदा आमचं ऊस दराचं रडगाणं... तुमचं चवीनं पाकात बुडवुन खाणं तुम्हाला मत देतीलचं.. नोकरीच्या आशेत खोळंबलेला तरूण... सलाम झेलतोय नगरसेवक चारपाच खटले भरुन सज्जन आजही देतोय पैसे बॅंकेच्या रांगेत उभारुन!! अचानक बदलणार...

Transcript

Image
18 नोव्हेंबर 1962 रोजी शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली. तळागाळातील, गोरगरीब विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाची गंगा प्रवाहित व्हावी हा शिवाजी विद्यापीठ स्थापन करणेच मूळ उद्देश होता आहे यापुढेही राहील. साहजिकच छत्रपतींच्या नावाने सुरु झालेल्या आपल्या विद्यापीठाची वाटचाल देखील उल्लेखनीय आणि अभिमान वाटावी अशीच आहे.   नुकतेच  ‘नॅक’ (बंगळूर) यांच्यातर्फे करण्यात आलेल्या तिसऱ्या पुनर्मूल्यांकनात शिवाजी विद्यापीठ 3.16 सीजीपीए गुणांकनासह महाराष्ट्रातील सर्वाधिक अग्रमानांकित विद्यापीठ ठरले आहे. कोल्हापूर ,सांगली, सातारा  परिसरातील विद्यार्थ्यांच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीची विद्यापीठ प्रशासनाला सुरुवातीपासूनच जाणीव राहिली आहे, ती आजही कायम असावी . केवळ पैशाअभावी विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी नाकारली जाऊ नये म्हणून अतिशय अल्प अथवा माफक शुल्कामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयीसुविधा उपलब्ध करण्याकडे विद्यापीठाचा आजही कल आहे. मला या विद्यापीठातून माझी पदवी घेतल्याचा सार्थ अभिमान आहे आणि तो कोणाला नसेल, छत्रपतींच्या नावाचा उल्लेख असणारी पदवी जगात दुसरीकडे कोठेही प्राप्त ह...
मराठी असतिल भाषा हजार तुमच्या आमुची आहे माय मराठी अमृतसुद्धा फिके पडते जेंव्हा कोणी गाय मराठी किती लिहावी किती पहावी अक्षरमोती हाय मराठी  लिहता कविता अशी सरकते जशी मलमली साय मराठी गाते कोकिळ वाटे मजला तिच्या मुखातुन व्हाय मराठी कुसुमा विंदा नेमाडेंची त्रिकाल लेणीच काय मराठी! ज्ञान पेरती कणाकणांतुन तरीही किती महाकाय मराठी ग्रंथ काव्य महाकाव्य पेलते तरिही सोपी जाय मराठी उर गर्व हा भरुनी बोले विश्व व्यापु जिंकाय मराठी गडदुर्गांच्या छायेमध्ये वाघिन शिवबांची हाय मराठी - अजय निंबाळकर

शिक्षक

शिक्षक... अक्षरांपासुन शब्दांपर्यंत बोबड्या बोलांपासुन वाक्यांपर्यंत हात धरुन गिरवुन गिरवुन कोरी पाटी भरुन काढलीत अनंत माणंस तुमच्यामुळे घडलीत गणित विज्ञान पक्के करत सखोल भुगोलही मनी ठसवला ईतिहासाचा संस्कार असा बालमनावर अजोड केला हाजार अडचणी पाठीस मारत कमी पगारात हजरी घेतलीत अनंत माणसं तुमच्यामुळे घडलीत स्वातांची पोरं घरात ठेवत जगाची पोर आपली मानत जाती पातीस फाट्यावर मारत एकतेची मशाल पेटती ठेवलीत प्रबोधनाच्या बाळकडुने किती हो माणंस महान बनवलीत बदली इलेक्शन जनगणनेतुनही आमच्या संगोपनाची कावड ना ढाळलीत हो म्हणेन मी भारताची पुढची पिढी सबंध तुमच्याच मुळे घडलित आज समजतात तुमची दु:ख तासिका वेतनावर कसा कराल संसार तो लख्ख! दिवसभर फुकट गाडा ओढुन महिण्या अखेरीस हिशेबच उरतो चक्क कोणाला न पर्वा न काळजी तुमच्या मनाची शिक्षकहो किति संयमाने करता सेवा आमच्या बालपनाची! आज शब्दांतुन तुमच्या व्याथांना वाचा फोडते आजवरचा प्रत्येक शब्द तुमच्या पायावर सोडते गर्वाने म्हणेनच तरिही भारत माझा महान आहे याच महान भारताचे शिक्षकच याची शान आहे