शब्द
शब्द असती शस्त्र अमुचे
शब्दची तलवार रे
ना भरोनी ये कशाने
घोर याचा वार रे
शब्द असती वेदना
अन शब्दची ललकार रे
एकबाणी तीर जैसा
ना असे माघार रे
शब्द असतो हाक
आणी शब्दची आव्हान रे
ठाम असता दिव्य होतो
पडतो सरकार रे
शब्द असतो ध्येय
ज्याला अर्थ असते कर्म रे
सत्य असता पर्वताची
ना ठेवतो दरकार रे
शब्द ऐसे दान
देई तो ठरावा कर्ण रे
पाळला ज्यांनी तयाला
इतिहास करतो याद रे
शब्द असतो नम्र तेंव्हा
होतसे संस्कार रे
शब्द बनता उग्र करतो
फक्त हाहाकार रे
शब्द असतो वाद
अन शब्दची संवाद रे
शब्द असते ज्ञान सारे
दीर्घ क्षि तिजापार रे
- अजय निंबाळकर
Comments
Post a Comment