आम्ही कशाला!!!
आम्ही कशाला!!! आमचे रस्ते .. तुमचे खड्डे आमची कर्ज... तुमच्या ठेवी आमची पोरंटारं... तुमचे भावी तुम्हाला मत देतीलचं.. बळीच्या आत्महत्यांची मढी ..तुमची कोट्याधिश भावी पिढी तुमच्या घर गाडी दौलती कारखाण्यांचे चाकर- पगारच्या हाडास चावणारा सरकारी नोकर प्रचारात फेकलेली भविष्यातली भाकर बघुन एका चपटीच्या घोटासकट तुमच्या दादा, भाऊ, पुतण्या , दिदी ताईच्या मागं नाचायला येतीलचं.. आम्ही कशाला!!! आमचे सरकारी दवाखाने...तुमचे ऐसपैस दिवानखाने गर्दीत गुदमरत्या लोकलची तावदाने..तुमच्या लाखोंच्या कर्जातही मिरवणारे कारखाने तुम्हाला मत देतीलंच.. मुक्या मध्यमवर्गाने भरलेले कर..भाऊंचे लखलखते घर कामगारांनी पुकारलेले संप...बागुलबुवांचे पक्षांतरांचे भुकंप चाराछावणीत पुढील वर्षी नवीन बगळे भेट देतीलचं आम्ही कशाला!!! आमची करपलेली रानं.. तुमच्या गळ्यातलं सोनं आमचा दरबुडवा कांदा...तुमचा राजकारणाबाहेचा सतेज धंदा आमचं ऊस दराचं रडगाणं... तुमचं चवीनं पाकात बुडवुन खाणं तुम्हाला मत देतीलचं.. नोकरीच्या आशेत खोळंबलेला तरूण... सलाम झेलतोय नगरसेवक चारपाच खटले भरुन सज्जन आजही देतोय पैसे बॅंकेच्या रांगेत उभारुन!! अचानक बदलणार...