Posts

देशभक्ती..एक नाटुकल

देश भ क्ती ... एक नाटुकल पक्या : देशभक्त ज्ञानी मन्या : कुतूहलीत देशभक्त पक्या : मन्या लेका कायतर केल पाहिजे लका,(मावा खून थुंकत ) आपल्या देशाची किंमत नाय हेनला ! मन्या : म्हणजे ओ दादा ! (सिगारेट पेटवत ) पक्या : अरे मंदाट्या,ह्या चड्ड्या घालून फिरणाऱ्या पोरी ! (गोगल वर सरकवत पार मुलगी दिसेना होते तोवर बघत ) मन्या : लय भारी दिसत्यात नाय दादा (लाजत) पक्या : अरे काळ्या ते न्हायी रे ..या पोरींनी देशाची पार अब्रू घालवली हाय बघ.कश्या वागत्यात काय फिरत्यात ! मन्या :भाऊ खरय बघा .. पक्या : लेका तिथ सैनिक जीव देतायत आणि या सेल्फी घेतात ! देशभक्ती च काय हाय का नाय ! मन्या : होय दादा,यांना सगळ्यांनी मिळून शिकवायलाच पाहिजे,मारू काय किक ? मन्या : पण तेनला सांगायचं काय ? पक्या : सांगायचं ! दोन द्यायच्या ठेऊन ...साधा चुडीदार घालून टिकली लाऊन आलीस तर ठीक (ढुंगणावर घसरलेली गुध्यावर फाडलेली  जीन्स  वर घेत) मन्या : मग तर आपल्या दादा गैंग च्या कोण वाऱ्याला पण याच नाय पक्या : येत्या १५ ऑगस्ट ला गैंग ची पोर घेऊन बायिक राली काढू तिरंगा घेऊन,या सगळ्या स्कुटी व...

एक झाड करपून गेल

Image
एक झाड करपून गेल एक झाड करपून गेल आजही नळाला पाणी आल न कोण रडल ना सुतक आल योजनेमध्ये लावल होत याच होत ना त्याच होत पाऊस औंदा झाला चांगला तवाच शेवटच न्हान झाल जनावर पण चाखत नव्हत वाडास कोणी देखत नव्हत सिझन गेला फोटोचा अन ऊन पानास जाळून गेल कुणी मुतल म्हणाव तरी सावली एवढ झाल नव्हत मालक वासा डोळ्यात राखाय सरकारी जागेत रंगून मेल   दिवाळी झाली शिमगा झाला वाळल्या काडीचा हुरडा केला बघता बघता मोसम गेला वैशाख वणव्यात पुन्हा एकदा वृक्षारोपणाची जागा झालं एक झाड करपून गेल आजही नळाला पाणी आल ......                            -अजय निंबाळकर

गणतंत्र

गणतंत्र ZP पासून दिल्ली पर्यंत आपला वंश अबाधित राखत आपलाच नातू आपलाच पणतू लोकमान्य कसा स्वताच लेखत सामान्यांच्या विकासाची आश्वासनी हलगी ठोकत पक्षनिष्ठा देशभक्ती चवीपुरती भाषणात चाटत ठरल्याप्रमाणे गरिबाला गरीबिसोबत घेऊन विकत तिरंग्याला शुभ्र कपड्यात सलाम ठोकणाऱ्या  नेत्यांना अभिनंदन हेच ६८ ठी गाठलेलं गणतंत्र ! अभिनंदन पार्ट्यांना बड्या धेन्डाच्या कार्ट्यांना होर्डिंग वरती गुलाल फेकत रंगून घेत्या कार्यकर्त्यांना निवडून आला वंश म्हणून गाव घुमवणाऱ्या पुंगळ्याना रास्ताय्वरच्या खड्ड्यातून सरकलेल्या मणक्यांना गणपतीच्या समोर बसत्या DOLBY च्या दणक्याना अभिनंदन नेत्यांना त्यांच्या पाळीव कुत्र्यांना तळवे चाटले गोड आहेत म्हणत राहत्या झेंड्याना बालाजीला भरघोस देत्या त्या निरागस दात्यांना भिकारणीच्या रिकाम्याच काळवंडलेल्या वाट्यांना चौका चौकात मारलेल्या देशभक्ती च्या बातांना सभेसाठी ट्रक भरून वाहत राहत्या लाटांना अभिनंदन रस्त्यांना घसरलेल्या पटरीना पुलासोबत वाहून गेल्या लोकशाहीच्या अस्थींना अभिनंदन जातींना धर्मशास्त्री मौलवींना धर्मा...

सैनिक

सैनिक खर्राटे की नींद सुनाकर बोला ख़ुद से वह अभी वहाँ पर मुस्तैद हमेशा जाग रहा होगा सर्द हवा के छूते ही ओढ़ा कम्बल फिर बोला खुदसे वो अभी वहाँ पर सरहद पर बेख़ौफ़ गोलियाँ दाग़ रहा होगा खाँसी सुनकर जब दादी की रूठी मैया वह उसी समय आवाज़ बारूदों की ख़ुदपर बरसाता होगा जब बारिश में उलटा छाता तन भीगा थोड़ा ओर याद किया वह डुबकी संग गहरायी में दुश्मन को चौंकाता होगा खाना खाकर यूँ दिल भरकर दी डकार हमने और अँगड़ायी लेकर जब देखा TV फिर सोचा खुद ही हर रोज़ हमारे इस दिनक्रम में वो रोज़ ख़बर की पट्टी में आता होगा यूँ शाहिद होता होगा .... फ़िर सोचा मेरी सर्दी ,मेरी बारिश ओर धूप सभी का आँचल वो है मेरी धरती मेरा अंबर मेरा सागर ओर निशा प्रभा का रक्षक वो है वो है तो हम है भारतीय सेना दिवस पर सभी भारतीय सैनिकों को मेरा गर्वित प्रणाम अजय निंबाळकर जय हिंद

नव्या जगाच भारुड

बया बया बया ! काय झालं बया ? दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई ! छोटाच फोन अन खोटच नेटवर्क फोन ला whatsapp  नाही मला दादला नको ग बाई ! जुनाच tv , केबल साधी LCD ची मज्जाच नाही मला दादला नको ग बाई ! खिडकीच AC ,चंबू चा SHOWER गरम पाण्याची धारच न्हाई मला दादला नको ग बाई ! एका जनार्दनी नेटवर आले पण तो speed येथे नाही मला दादला नको ग बाई                                                     अजय निंबाळकर (विडंबन मुळ रचना संत एकनाथ )

YES WE CAN

बराक ओबामा ... अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष .. या मानसाच नाव वाचलं की त्यांच्या देशाच्या स्वातंत्र्याची अन लोकशाहीची व्याप्ती अन समृद्धी लक्षात येते . मी ८ वर्ष पाहत आलोय आजवरच्या तर सोडाच अगदी अखेरच्या भाषणात सुद्धा त्यांचा मी पणा स्वयं प्रसिद्धी ची साधी झालर पण दिसली नाही. देश प्रगत आहे पण हाच देश ८ वर्षापूर्वी बेघर झाला होता स्वताच्या देशात. एक माणूस पुढे आला सर्वाना सोबत घेतल आणि म्हणाला ... “YES WE CAN…” अन त्याने करूनही दाखवल पण फरक हा कि याचा गाजावाजा नाही केला कर्माच महत्व हे की त्याची महती सांगावी व पोहचावी लागत नाही. काम केल कि ते दिसत , बोलत प्रसंगी ओरडत सुद्धा. अर्थार्थ हे "करून दाखवल , कामगिरी दमदार ....होर्डींग्ज वाल्यांना लागू नाही " गजब एका गोष्टीच वाटलं की आज इतक्या मोठ्या पदावरून निवृत्त होताना त्याच्या चेहऱ्यावरच्या रेषा किंचितही गोंधळल्या नाहीत ! मी नेहमी म्हणतो " काही माणस मनामध्ये ज्ञानाचा महासागर लोटूनही शांत असतात त्यांच्या नुसत्या लाटा जरी मोजल्या तरी ज्ञानार्जन होत " हे तंतोतंत तुम्हाला...

लज्जा

लज्जा सीना देखो उसका अब तो उसको दबा भी देना माँ ने दूध दिया वहीं से बात यही  बस ध्यान ये देना कम कपड़ों में आयी है तंग स्तन का आनंद लेना शर्म से पानी हूवा था तू जब छतपर  बारिश में भीगी थी बहना नुक्कड़ में है मिली अकेली कसके उसको दबोच ही लेना कुत्ते की औक़ात जो है निर्लज्जित बन सब नोच ही लेना पिट ढिंढोरा संस्कृति का दुशासन का प्रमाण देना बहना का भी हाल यही है तू ही नहीं ओर भी है ना !  शर्म करो मत उसका दामन गौण हुआ है इज़्ज़त का मतलब समझाना पुरुष हो तुम तो सब जायज़ है  सदैव तेरा गर्वित सीना हिंदू मुस्लिम सिख इसायी सब का इसपे एक कहना अत्याचारी नेक है सारे !कपड़ों को यही भुगतना !! मानवता का धर्म किसिको समझाने पर ध्यान ना आए घर की माता बाहर रंडी वाह रे दुनिया वाह रे परखना धिक्कार करूँ उस मनुष्यता का लिंगभेद है जिसका धोरन हर ममता को बाहर देखें सज्जनता ही करती शोषण शंढो की बढ़ती आबादी ले डूबेगी तुझे मुझे भी प्रहार करो उस दुशासन पर जो हर मुझ तुझ छिपा जो है ना " घर की बेटी बाहर जाय तो उसके पीछे तुम भी जाना...