YES WE CAN
बराक ओबामा ...
अमेरिकेचे माजी
राष्ट्राध्यक्ष ..
या मानसाच नाव वाचलं की
त्यांच्या देशाच्या स्वातंत्र्याची अन लोकशाहीची व्याप्ती अन समृद्धी लक्षात येते
.
मी ८ वर्ष पाहत आलोय
आजवरच्या तर सोडाच अगदी अखेरच्या भाषणात सुद्धा त्यांचा मी पणा स्वयं प्रसिद्धी ची
साधी झालर पण दिसली नाही.
देश प्रगत आहे पण हाच
देश ८ वर्षापूर्वी बेघर झाला होता स्वताच्या देशात.
एक माणूस पुढे आला
एक माणूस पुढे आला
सर्वाना सोबत घेतल आणि
म्हणाला ...
“YES WE CAN…”
अन त्याने करूनही दाखवल पण फरक हा
कि याचा गाजावाजा नाही केला
कर्माच महत्व हे की
त्याची महती सांगावी व पोहचावी लागत नाही.
काम केल कि ते दिसत,बोलत प्रसंगी
ओरडत सुद्धा.
अर्थार्थ हे "करून
दाखवल ,कामगिरी
दमदार ....होर्डींग्ज वाल्यांना लागू नाही "
गजब एका गोष्टीच वाटलं
की आज इतक्या मोठ्या पदावरून निवृत्त होताना त्याच्या चेहऱ्यावरच्या रेषा किंचितही
गोंधळल्या नाहीत !
मी नेहमी म्हणतो
"काही माणस
मनामध्ये ज्ञानाचा महासागर लोटूनही शांत असतात त्यांच्या नुसत्या लाटा जरी मोजल्या
तरी ज्ञानार्जन होत "
हे तंतोतंत तुम्हाला
लागू होईल .
आम्ही नक्कीच
तुमची प्रेरणा घेऊ व लोकशाही अबाधित राहावी यासाठी प्रयत्न करू
एक माणूस
अजय निंबाळकर
अजय निंबाळकर
Comments
Post a Comment