एक कप चहा घ्यायचं म्हणतोय...
एक कप चहा घ्यायचं म्हणतोय...
एक कप चहा घ्यायचं म्हणतोय
सोबत तिला न्यायचं म्हणतोय..
कटिंग कशाला फुल्ल ही
चालेल..
तेंव्हाच तर ती चहा थंड होवु
पर्यंत बोलेल.
थंड चहा पण हौसेनं प्यायचं
म्हणतोय,
एक कप चहा घ्यायचं म्हणतोय.
साखर जरा कमीच असावी
मधुरता तिच्या बोलण्यातुन यावी
पहाटेच्या दाट धुक्यात
ती अशीच माझ्या समीप बसावी
गुलाबी थंडी म्हणजे नेमकी काय
हे तिलाही
एकदा दाखवावं म्हणतोय..
एक कप चहा घ्यायचं म्हणतोय..
बिस्किट तिला पार्लेच आवडतात
दुसरी कुठं खिशास परवडतात..
पण तिला पाहुण
फक्त १० रुपयात झोपा गल्ली च्या उडतात..
रोज लोक बडबडतात
आज थोड मीही गुज छेडायचं
म्हणतोय..
एक कप चहा घ्यायचं म्हणतोय.
अजय निंबाळकर
Very nicely stated.
ReplyDelete